Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमिताभ बच्चन यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात पार पडली अँजिओप्लास्टी

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षी देखील काम करत असल्यामुळे कायमच त्यांच्या फिटनेसची चर्चा होत असते. आता

जया बच्चनला घाबरतात अमिताभ बच्चन ?
स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’
टायगर-क्रिती सेननच्या ‘गणपत’ मध्ये अमिताभ बच्चनची दमदार एन्ट्री.

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षी देखील काम करत असल्यामुळे कायमच त्यांच्या फिटनेसची चर्चा होत असते. आता या सगळ्यातच दिग्गज अभिनेते अमिताभ यांची अँजियोप्लास्टी झाल्याची बातमी समोर आली आहे. कायमच आपल्या सिनेमांमुळे चर्चेत असलेले बिग बी आज तब्बेतीच्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या आरोग्याच्या या बातमीने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची आज सकाळी अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे. ही सर्जरी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात पार पडली. याबाबत अद्याप कोणतेही इतर माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, आज सकाळी 6 वाजता अमिताभ बच्चन यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे

COMMENTS