Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यापीठांवर अमित ठाकरेंनी काढला मूक मोर्चा

पुणे : पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते

पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांना अमित ठाकरेंचा टोला 
पुणे लोकसभेची जबाबदारी अमित ठाकरेंवर ?
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार?

पुणे : पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मूक मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये शहरातील विविध भागांतील विद्यार्थी आणि मनसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे तीन हजार, तर पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील संलग्न 800 महाविद्यालयांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणानंतर, त्यांच्या रोजगारासाठी विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे घ्यावेत. विद्यापीठात शिकणार्‍या साधारण हजार विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहाची कमतरता आहे. त्यामुळे तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच वसतीगृहात राहणार्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकाराचे जेवण मिळावे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ही मराठी भाषेचा प्रसार प्रचार करण्यासाठी झाली आहे. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करून ते विद्यार्थी, नागरिकांसाठी खुले करावे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपासून अशांतता असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. अशावेळी विद्यापीठाची शांतता भंग करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तसेच धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार होऊ नये, यासह अनेक मागण्यांसाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. शर्मिला ठाकरेदेखील मोर्चात सहभागी झाल्या. आज सकाळी 9 वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी मनसेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या मोर्चामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होता कामा नये, या पार्श्‍वभूमीवर अमित ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल सायंकाळच्या सुमारास शहर पदाधिकार्‍यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये 9 ऐवजी 12 वाजता आणि मूक मोर्चा असणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयानुसार अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मूक मोर्चाला सुरुवात झाली. त्या मोर्चात मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, म.न.वि. से. राज्य सरचिटणीस आणि प्रवक्ते काळे, मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यासह विद्यार्थी आणि मनसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत.

COMMENTS