Homeताज्या बातम्यासंपादकीय

शरद पवारांची संदिग्ध भूमिका

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडतांना दिसून येत आहे. त्यामागे सर्वात मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष

विरोधकांची हतबलता…
नावात काय आहे ?
संसद लोकांचे प्रतिबिंब

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडतांना दिसून येत आहे. त्यामागे सर्वात मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका. राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चांगलेच बिनसेल, टोकाचा वाद होईल, टोकाच्या टीका होतील अशी अटकळ बांधली जात होती, मात्र त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांविषयी मवाळ भूमिका घेतली आहे. अजित पवारांनी पक्षावर दावा केला असला तरी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षात फूट पडली नसल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण राजकारणामागे शरद पवारांची धूर्त चाल असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर शरद पवार अणि अजित पवारांनी एका उद्योगपतींच्या घरी भेट झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही कौटुंबिक भेट असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत असला तरी, यातील बाबी लक्षात घेणे गरजेच्या आहेत. त्या म्हणजे जर ही कौटुंबिक भेट होती, तर मग ती घरी किंवा शरद पवार किंवा अजित पवारांच्या बंगल्यावर घेता आली असती ? कौटुंबिंक भेट ही त्या उद्योगपतीच्या घरी कशासाठी घेतली जाते? कौटुंबिक भेटीच्या वेळी जयंत पाटील कशाला हवेत ? या प्रश्‍नांचे उत्तर महाराष्ट्र मागतांना दिसून येत आहे. मात्र अजित पवार असो की शरद पवार यांच्याकडून मात्र उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष सावध झाले आहे. काँगे्रसने तर राष्ट्रवादीशिवाय निवडणुका लढण्याची तयारी केली आहे. कारण शरद पवार जरी आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट करत असले तरी, ते केव्हा कात्रजचा घाट दाखवतील, केव्हा युटर्न घेतील, सांगता येत नाही. त्यामुळे काँगे्रसने सावध पवित्रा घेतला आहे. शरद पवारांच्या नावाभोवती वलय असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. काँगे्रसच्या काही नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपला शरद पवार आपल्यासोबत हवे आहेत. त्यांना केंद्रामध्ये कृषीमंत्रीपद देण्याची तयारी देखील भाजपने दर्शवली आहे. तसेच सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना देखील सत्तेत सामावून घेण्याची तयारी भाजपने दर्शवली असून, तसा प्रस्ताव देण्यासाठीच अजित पवार यांनी ही भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र जर  शरद पवार भाजपसोबत गेल्यास त्यांच्या प्रतिमेला तडा जावू शकतो, त्यांची विश्‍वासार्हता धोक्यात येवू शकते. कारण शरद पवारांनी आपली उभी ह्यात काँगे्रसचा विचार जपण्यात धन्यता मानली, त्यासोबतच त्यांनी महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. मात्र जर शरद पवार भाजपसोबत गेल्यास, शरद पवारांची राजकारणाीतील ती शेवटची मोठी घोडचूक ठरू शकते. मात्र शरद पवार नेहमीच वस्तूनिष्ठ राजकारणाला प्राधान्य देत आले आहे. लोक काय म्हणतील? याचा विचार त्यांनी आपल्या उभ्या ह्यातीत कधी केला नाही. त्यामुळे पवार कधी काय निर्णय घेतील सांगता येत नाही ? राष्ट्रवादी काँगे्रस कुणाची? या पक्षाच्या चिन्हावर कोण लढणार? याचा फैसला निवडणूक आयोगाला आगामी निवडणुकांच्या आधीच घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर राज्यात काही पोटनिवडणुका येवू घातल्या आहेत. त्याअगोदर निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे शरद पवारांची भूमिका संदिग्ध असल्यामुळे राजकारणात भविष्यात मोठा उलटफेर बघायला मिळू शकतो. त्यामुळे शरद पवारांनी जर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडी धोक्यात येईल, आणि इतर घटक पक्षांना एकत्र ठेवू शकेल असा नेता, महाविकास आघाडीत सध्यातरी कुणी नाही. 

COMMENTS