Homeताज्या बातम्यामनोरंजन

राम चरणच्या मुलीसाठी अंबानी कुटुंबाने दिला 1 कोटींचा सोन्याचा पाळणा!

अभिनेता राम चरण आणि पत्नी उपासना कोनिडेला यांना नुकतचं कन्यारत्न प्राप्त झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कन्यारत्न झाल्याची माहिती च

माणसाने विनोदी असणं हे जिवंत पणाचे लक्षण; डॉ मिर्झा रफी अहमद बेग
नगरमधील सहा रुग्णालयांना नोटिसा, पैसे परत करण्याचेही आदेश
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन

अभिनेता राम चरण आणि पत्नी उपासना कोनिडेला यांना नुकतचं कन्यारत्न प्राप्त झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कन्यारत्न झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. काल हैदराबादमध्ये त्यांच्या लाडक्या लेकीचं बारसं पार पडलं. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेर लावली होती. विशेष म्हणजे, देशातील श्रीमंत उदयोगपती मुकेश अंबानी यांनी रामचरणच्या लेकीला भेट म्हणून तब्बल एक कोटीचा सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आणि नीता अंबानीदेखील राम चरणच्या आनंदात सहभागी झाले आहेत. राम चरणच्या लेकीला त्यांनी सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला आहे. या पाळण्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. राम चरण आणि उपासनानेदेखील एक खास पाळणा बाळासाठी आणला होता. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

COMMENTS