Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने 500 कोटींच्या ठेविचा टप्पा ओलांडत 5 कोटी रुपयांचा मिळवला करपूर्व नफा

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने सन 2022-2023 मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे 31 मार्च 2023 अखेर बँकेने  500 कोटींच्या ठेविचा

मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये म्हणून पालकांने पण सतर्क राहिला पाहिजे – चित्रा वाघ 
बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)
कायदा व सुव्यवस्थेचे पालन स्वतःपासून करावे

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने सन 2022-2023 मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे 31 मार्च 2023 अखेर बँकेने  500 कोटींच्या ठेविचा टप्पा ओलांडला आहे . गत वर्षाच्या तुलनेत रुपये  14 कोटीची वाढ झालेली आहे. बँकेची एकूण सभासद संख्या 11747 एवढी असून  तसेच मार्च 2023 अखेर बँकेचे कर्ज व्यवहार रु.319 कोटी इतके झाले आहे.  या आर्थिक वर्षात रु.17 कोटी एवढे भाग भांडवल असून बँकेचा स्वनिधी  रु .40 कोटी 46 लाख एवढा आहे. बँकेची एकूण गुंतवणूक रु 217 कोटी एवढी आहे . 31 मार्च 2022 अखेर बँकेने एकूण ठेवी रु. 500 कोटी 19 लाख इतक्या केलेल्या आहेत . गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 14 कोटी रुपयांची व्यवसायात वाढ झाली आहे. बँकेस  31मार्च 2023 अखेर 3 कोटी 50 लाख इतका निव्वळ नफा मिळवलाआहे.                                                            सर्व क्षेत्रातील परिस्थिती पाहता बँकेचे संचालक मंडळ,  अधिकारी व कर्मचारी वृंद  तसेच कर्जदार , ठेवीदार  व सभासद यांच्या सांघिक कामगिरीमुळे बँकेस हे प्रगतीचे उद्दीष्ट साध्य करता आले असल्याचे बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे . मार्च 2023 अखेरील बँकेची प्रगती ही बँकेच्या पुढील वाटचालीस नवीन उभारी देणारी असून बँकेच्या सभासदांनी व ग्राहकांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवल्याची पावती असल्याचे देखील मोदी यांनी नमूद केले आहे. चालु आर्थिक वर्षात अनंत अडचणी येऊनही बँकेच्या वसुली विभागाने समाधानकारक काम करत बँकेचा निव्वळ एनपीए 0.35 टक्के राखण्यात बँकेस यश मिळवले आहे . कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमी, देशातील आर्थिक मंदी, तसेच वाढती महागाई अशा अवघड परिस्थिती देखील कर्जधारक ग्राहकांचा विचार करुन बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक ठेवण्यास यश मिळवले असे मत बँकेचे  संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी यांनी व्यक्त केले. बँकेचे सर्व सभासद, ग्राहक यांचा विश्वास, बँकेचे संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन व बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वृंदाचे नियोजनबध्द कामकाज यामुळे सन 2022 – 2023 मध्ये चांगले कामकाज करणे शक्य झाले आहे. अशीच कामगिरी पुढील आर्थिक वर्षातही कायम ठेवण्याचा बँकेचा प्रयत्न असेल अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने केवळ अर्थकारण च न करता मागील काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत .मागील वर्ष हे बँकेचे रौप्य महोत्सवि वर्ष साजरे करून  त्यानिमित्ताने शहरात अनेक कार्यक्रमाची मांदियाळी दिसून आली. ज्यामध्ये शहरातील गुणिजनांचा सन्मान , रक्तदान शिबिर याबरोबरच महिलांसाठी बँकिंग क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी बँकिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन देखील करण्यात येऊन विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते .या व अशा इतर अनेक कारणांमुळे बँक ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे समाधान बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले आहे .यापुढेही अर्थकारणासोबतच वारंवार असेच सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतील असा संकल्प राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला .

COMMENTS