छ.संभाजीनगर ः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र ठाकरे गटाकडून चंद्र

छ.संभाजीनगर ः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत दिल्यानंतर दानवे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र दानवे यांचे बंड म्यान झाले असले तरी, त्यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. कारण ठाकरे गटातील विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी रविवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील आमदारांची संख्या कमी झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँगे्रसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेत सध्या ठाकरे गटाचे 8 सदस्य आहेत. आमश्या पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हे संख्याबळ 7 वर घसरले आहे. त्यातच ठाकरे गटाच्या 3 आमदारांचा कार्यकाळ येत्या जून व जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ 4 पर्यंत घसरून आपसूकच अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची महाविकास आघाडीतील काँग्रेसला मिळणार आहे. विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ पुढील 2 महिन्यांत कमी होईल. सध्या ठाकरे गटाकडे 7 आमदार आहेत. तसेच यापैकी 3 आमदारांचा कार्यकाळ जून व जुलैमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे विरोधी पक्ष नेते पद धोक्यात आले आहे. सध्या काँग्रेसचे 8 आमदार आहेत. त्यापैकी 2 आमदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यानंतरही काँग्रेसकडे 6 आमदार उरतील. उलटपक्षी ठाकरे गटाकडे 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अवघे 3 आमदार उरतील.
परिणामी, सभागृहातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची मिळेल असे समीकरण आहे. विधान परिषदेतील या संख्याबळाच्या आधारावर अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाईल. प्रत्यक्षात खरेच असे घडले तर काँग्रेसमध्ये सतेज पाटील हे या पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात. काँग्रेसने यापूर्वीही त्यांच्यासाठी अशी मागणी केली होती. कारण, राजकीय मुत्सद्दीपणा, राज्यभर नेतृत्व करण्याची क्षमता व काँग्रेसाल जिंकण्याची सवय लावणारा नेता म्हणून सतेज पाटील यांना ओळखले जाते. काँग्रेसचा राज्यभरात सर्वत्र पराभव होत असताना त्यांनी कोल्हापुरात पक्षाला चांगले दिवस आणून दिले. विशेषतः पुणे पदवीधर व पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी ज्या प्रकारे रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केला, त्याचे फळ त्यांना काँग्रेस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या रूपात देईल असे सांगितले जात आहे.
COMMENTS