Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबादास दानवे यांनी केज तालुक्यात नुकसान झालेल्या फळबाग व पिकाची केली पाहणी

बीड प्रतिनिधी - मागील चार दिवसांत अवकाळी पावसामुळे गारपीट होऊन अनेक गावांत शेतकरी बांधवांचे शेतातील फळबाग लागवड व पिकाची अतोनात नुकसान झाली यामुळ

दिंडोरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सवांद यात्रा संपन्न (Video)
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन
मराठा आरक्षणाची संधी केंद्राने गमावली – अशोक चव्हाण

बीड प्रतिनिधी – मागील चार दिवसांत अवकाळी पावसामुळे गारपीट होऊन अनेक गावांत शेतकरी बांधवांचे शेतातील फळबाग लागवड व पिकाची अतोनात नुकसान झाली यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे यामुळे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शेतात जाऊन मौजे बोरगांव येथील शेतकरी दता शिंदे यांच्या नुकसान झालेल्या फळबाग व पिकाची पाहणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादास दानवे साहेब यांनी केली व संबंधित प्रशासनला प्राथमिक तात्काळ मदत करण्याचे आवाहन केले तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत थेट शेतकर्‍यांना फोनवर बोलणं करून दिल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी शेतकरी बांधवांचे सांत्वन केले व मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी शिवसेना आवाज उठवेल असे आश्वासन दिले यावेळी दौर्‍यात शिवसेना बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव अनिल दादा जगताप लोकसभा प्रमुख माजी आमदार सुनील दादा धांडे सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे उपजिल्हाप्रमुख दिपक बप्पा मोराळे रामराजे सोळंके केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे अंबाजोगाई तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे जिल्हा संघटक अभिमान बापु पटाईत अंबाजोगाई तालुका प्रमुख मदन परदेशी माजलगाव तालुका प्रमुख प्रभाकर धरपडे अतुल उगले विधानसभा प्रमुख अशोक जाधव नामदेव सोजे युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात तालुका सचिव रामहरी कोल्हे उपतालुकाप्रमुख अभिजीत घाटुळ सुनील पटाईत विशाल कोकाटे अंबाजोगाई शहर प्रमुख गजानन मुडेगावकर किशोरजी जगताप शेख निजाम रोहित कसबे राहुल अंधारे गणेश निगुळे निलेश निगुळे सह सरपंच व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते..

COMMENTS