Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपल्या जीवनात कायम आनंदी राहा-ह.भ.प. मोहन महाराज खरमाटे

बीड प्रतिनिधी - दैनंदिन जीवन जगत असताना माणसाच्या वाट्याला सुख कमी व दुःखच जास्त येते याचे कारण म्हणजे आपले मन आहे .सुख हि कल्पना आपल्या मानण्या

नाशिक मध्ये पुन्हा हृदय पिळवटून टाकणारी घटना
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी संगीत आखाडी (बोहडा) लिंगदेव गावामध्ये मध्ये संपन्न
शिंदे शिवसेनेच्या आमदारांमध्ये फ्री स्टाईल

बीड प्रतिनिधी – दैनंदिन जीवन जगत असताना माणसाच्या वाट्याला सुख कमी व दुःखच जास्त येते याचे कारण म्हणजे आपले मन आहे .सुख हि कल्पना आपल्या मानण्यावर आहे कितीही अडचणी आल्या तरी खचू नका, धीर सोडू नका, व घाबरून जाऊ नका, कारण जगाचा पालन करता भगवान आपल्या पाठीशी आहे आपल्या जीवनात कायम आनंदी राहा. असा मोलाचा संदेश भागवत कथा प्रवृत्ती मोहन महाराज खरमाटे यांनी काल यशवंत नगर येथील कथेमध्ये दिला.
बीड येथील नाट्यगृहाच्या मागे यशवंत नगर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे संगीत श्रीमद्भागवत कथा ज्ञान यज्ञ मोठ्या भक्तिमय उत्साही वातावरणामध्ये कथेचे सांगता झाली मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या जीवनात वेळेला महत्त्व दिले पाहिजे वेळही खूप मौल्यवान आहे एकदा वेळ निघून गेली की ती परत येत नाही त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात नेहमी आनंदी राहा आपल्या चेहर्‍यावरचा आनंद हा ओसंडून वाहू द्या याबरोबरच महाराजांनी सांगितले की शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी वेळच्यावेळी करा आपल्या जीवनामध्ये शास्त्राला खूप मोठे महत्त्व आहे नेम धर्म पाळत राहा, भगवंताचे नाम चिंतन सतत करा, याचा मोठा होणारा फायदा म्हणजे आपले सैरभैरझालेले मन स्थिर होऊन आपणास आनंद मिळेल. असा महत्वपूर्ण सल्ला भागवत कथा प्रवक्ते खरमाटे महाराज यांनी सर्व त्यांना दिला.
सात दिवसाची भागवत कथा म्हणजे आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्य होय कारण या सात दिवसांमध्ये भगवंताच्या नवनवीन कथा व महात्म्य दररोज श्रोत्यांना श्रवण करण्यासाठी मिळते म्हणजेच सात दिवस भक्तीचा आनंद समाधान देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे भागवत महापुराण ग्रंथ आहे. काल दिनांक 8 /8 /2013 मंगळवारी कथेच्या सांगते निमित्त यशवंत नगर येथील भाविक भक्त माता-भगिनींनी भागवत ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच यशवंतनगर येथील सर्वांच्या सहकार्याने या भागवत ग्रंथाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले होते कथेच्या शेवटी भागवत ग्रंथाची महाआरती होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला. हा संगीत श्रीमद्भागवतकथा ज्ञान  सोहळा यशस्वी करण्यासाठी यशवंत नगर येथील सिद्धिविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष अँड.मंगेशजी पोकळे, ह. भ.प. डॉक्टर केशवदास वैष्णव महाराज, मुकुंद भूतपल्ले, विलास लेंभे, वाल्मीक चाटे, महावीर बोरा, जोशी काका, तांबे काका, साईनाथ दुधाळ, मुंडे साहेब,  सतीश राव पोकळे  बाळासाहेब पिंगळे, महावीर बोरा घोळवे नाना,मोहन जोशी, प्रकाश म्हेत्रे ,श्रीराम परदेशी , डॉ.मिसाळ, वालचंद चाटे, यांच्यासह यशवंत नगर मधील सर्व भाविक भक्तांनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS