Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमान गोकुळचंजी विद्यालयामध्ये माजी विद्यार्थीचा मेळावा उत्साहात

तब्बल 52 वर्षानंतर एकत्र आले मित्र-मैत्रिणी

कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयामध्ये 1972 मध्ये दहावीत  शिक्षण  घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी दिनांक 19म

आरोपीचा पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न
शाळा परिसर व तंबाखूमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
नगरपरिषदेने फंडातून एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी ;उपनगराध्यक्ष, भाजप, शिवसेना नगरसेवकांची मागणी

कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयामध्ये 1972 मध्ये दहावीत  शिक्षण  घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी दिनांक 19मे रोजी संपन्न झाला. तब्बल 52 वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी तसेच विद्यालयांचे सेवानिवृत्त शिक्षक एकमेकांना भेटुन शाळेच्या जुन्या आठवणीत रममाण झाले. होते या मेळाव्याचेचे अध्यक्षस्थानी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप अजमेरे होते. पिपल्स बकेचे माजी अध्यक्ष रामविलास मुंदडा मुख्याध्यापक मकरंद कोर्‍हाळकर, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षिका उमा रायते आदी या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी नमस्कार करुन टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. माजी विदयार्थीच्या स्वागतामुळे शिक्षक वृंद अक्षरशः भारावून गेले.  तत्कालीन दिवंगत शिक्षक आणि माजी विदयार्थीना श्रद्धांजली वाहीली. या वेळी माजी शिक्षक नंदकीशोर परदेशी म्हणाले कर्तृत्ववान पिढी घडवण्यासाठी शिक्षकां बरोबरच पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे.मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी प्रास्ताविक केले. तर साठी गाठलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आता सुदृढ आरोग्यासाठी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे सांगून सर्वानी कुटुंबांसह स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव कार्यक्रमाचे अध्यक्ष दीलीप अजमेरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे व सहसचिव सचिनअजमेरे, पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष रामविलास मुंदडा यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. त्यानंतर निवृत्त शिक्षक रजनी गुजराती, माजी मुख्याध्यापक ए.एच. कुलकर्णी, नंदकीशोर परदेशी व माजी उपमुख्याध्यापक रमेश लुंपटकी त्या प्रमाणे विदयालयांचे मुख्याध्यापक  मकरंद पुरुषोत्तम कोर्‍हाळकर, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड पर्यवेक्षिका उमा रायते, शिक्षक सुरेश गोरे, अनिल अमृतकर सुरेश बजाज, सुधीर निसाळ, सुरेश कुर्लेकर, श्रीमती शोभा पांडे व रविंद्र कोर्‍हाळकर, डॉ. उदय क्षत्रिय, तेजमल धाडीवाल, डॉ. प्रदीप गिरमे, अशोक होडे आणि सुशिला अग्रवाल यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. या सर्वांचे श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे  स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दीलीप अजमेरे, सहसचिव सचिव अजमेरे, सदस्य राजेश ठोळे, आनंद ठोळे, संदीप अजमेरे, अमोल अजमेरे यांनी अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे विद्यालयांचे शिक्षक सुरेश गोरे यांनी सूत्रसंचालन सुधीर निसळ यांनी आभार मानले.

COMMENTS