आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत –  उद्योगमंत्री उदय सामंत 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत –  उद्योगमंत्री उदय सामंत 

 औरंगाबाद प्रतिनिधी - राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या गटातील आमदारांचा उल्लेख शिंदे गट असा उल्लेख केला जातो. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
ओबीसी संघटना आजपासून मैदानात

 औरंगाबाद प्रतिनिधी – राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या गटातील आमदारांचा उल्लेख शिंदे गट असा उल्लेख केला जातो. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत. निवडणूक आयोगाने आम्हाला त्या नावाने मान्यता दिली आहे. अस मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.संजय राऊत यांनी अशाच पत्रकार परिषद घ्याव्यात. राज्यातील मनोरंजन क्षेत्र राज्याबाहेर जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी टीका केली. मात्र अशा टीका ते नेहमीच करतात. महिलांबाबत बोलणारे, आमचे मुडदे पाडू अस बोलणाऱ्या राऊत यांच्यबाबत काय बोलावं. पुढील पंचवीस वर्षे ते असेच बोलत राहावे अशी सदिच्छा अस म्हणत उदय सामंत यांनी टीका केली.

तर बुधवारी दिवसभर अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत दोन वेगळे वक्तव्य पाहायला मिळाल्या. त्यामधे देशाचे नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आणि अजित पवार आपल्या मतावर ठाम राहणे हे पाहून तुम्हाला लक्षात येईल अशी टीका देखील उदय सामंत यांनी केली.  मसिया तर्फे शेंद्रा औद्योगिक वसाहतीत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आयोजित होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड असल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला असला तरी शेवटच्या दिवशी ते येऊ शकतात अशी शक्यता उदय सामंत यांनी वर्तवली. उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री संदीपान भूमरे, मंत्री अतुल सावे, अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत प्रदर्षाचे उद्घाटन सोहळा पार पडला.

COMMENTS