Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमच्या सरकारची खात्री नसली तरी आठवले मंत्री होण्याची खात्री ः गडकरी

नागपूर ः  आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गँरटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गँरटी आहे. सरकार कोणाचेही आल

Maharashtra : फडणवीस गडकरींच्या बैठकीनंतर भाजप नगरसेवकांची झोप उडाली…! (Video)
टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल-गडकरी
आता रस्त्यावरील पी…पीपी.. कीकि…. हॉर्न बंद होणार येणार नविन

नागपूर ः  आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गँरटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गँरटी आहे. सरकार कोणाचेही आले तरी रामदास आठवले यांचे मंत्रिपद पक्के आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते नागपुरात एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना रविवारी नागपूरच्या सिविल लाईन्स स्थित चिटणवीस सेंटर येथील बनयान सभागृहामध्ये गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की, दलित समाजासाठी काम करतांना दलित शोषित समाजाला न्याय देण्याचं काम रामदास आठवले यांनी केले असून  दलित चळवळीच रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवलेंनी पुढाकार घेतला असल्याचे गडकरी म्हणाले. मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या पुरस्काराच स्वरूप पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील स्मारक, मुंबईच्या इंदू मिलच्या जागेत साकार होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक या प्रकल्पांसाठी  रामदास आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांचे सामाजिक आणि राजनीती कार्य हे मोठे आहे असे देखील गडकरी यांनी यावेळी नमूद केले. सामाजिक, राजकीय, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम गिरीश गांधी करत असल्याचे देखील गडकरी यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आठवले यांनी सांगितले  की, मी दलित पँथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणार्‍या कार्यकर्त्यांच्या, साहित्यिकांच्या चळवळीतून पुढे आलो असून आम्हाला समाजामध्ये प्रॅक्टिकल आंबेडकरीझम-व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे. संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका होती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण,  गोलमेज परिषदेतील भाषण आजही लोकांच्या लक्षात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व रुजवण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्थातून सुमारे 1 लाख विद्यार्थी अनेक विद्याशाखेंमध्ये शिक्षण घेत असल्याचे देखील आठवले यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मारवाडी फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

COMMENTS