Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आई-वडिल अशिक्षित असूनही संघरत्न झाला उपशिक्षणाधिकारी

अर्धापूर प्रतिनिधी - अर्धापूर तालुक्यातील सांगवी खु. येथील शेतकरी दांपत्य गोविंदराव सरोदे व शांताबाई सरोदे हे दोघेही निरक्षर असून त्यांनी आपल्य

उदगीर येथे बसस्थानकात प्रवाशांचे प्रचंड हाल
विठ्ठल-रुक्मिणी पूजेची आता घरबसल्या बुकिंग
किरकोळ बाजारात भाजीपाला महागला

अर्धापूर प्रतिनिधी – अर्धापूर तालुक्यातील सांगवी खु. येथील शेतकरी दांपत्य गोविंदराव सरोदे व शांताबाई सरोदे हे दोघेही निरक्षर असून त्यांनी आपल्या मुलाला शिकविले.त्यांच्या कष्टाला फळ आले आणि त्यांचा मुलगा संघरत्न सरोदे यांनी राज्य लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले असून त्यांची नुकतीच जिल्हा उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे.यापूर्वी संघरत्न सरोदे यांनी डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एसटीआय) च्या परीक्षेत मुंबई राज्यकर निरीक्षक पदी निवड झाली होती.आता खडतर प्रयत्न करून त्यांनी जिल्हा उपशिक्षणाधिकारी पदासाठी मजल मारत तरुणांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. घरी तीन एकर शेती असल्याने कुटुंबाचा सर्व उदारनिर्वाह शेतीवरच चालतो.संघरत्न सरोदे यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले,माध्यमिक शिक्षण कामठा बु.येथे झाले.सांगवी  या गावापासून कामठा  बुद्रुक  गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे .शाळेसाठी  दररोज तीन किलोमीटर जाणे येणे करावे लागत होते. तर उच्च माध्यमिक शिक्षण हे नांदेड येथे तर पदवीपर्यंतचे शिक्षण अर्धापूर येथे झाले.त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एसटीआय)च्या निकालात मुंबई राज्यकर निरीक्षक पदी निवड झाली.2021 ऐवजी 2022 मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून संघरत्न सरोदे यांची जिल्हा उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे.आई-वडील हे निरक्षर असतानाही त्यांनी ताई वैशालीस शिकवलं,ती क्लर्क म्हणून कळमनुरी येथे कार्यरत आहे.ताई वैशाली व भाऊ रवी सरोदे यांनी मोलाचे मार्गदर्शन व मदत केली,माझ्या यशामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे यावेळी संघरत्न सरोदे यांनी सांगितले.खर्‍या अर्थाने आई-वडिलांच्या कष्टाच चीज झालं,ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपल्या गावाचे नाव राज्यस्तरावर मोठे केल्याबद्दल ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून त्यांचे व कुटुंबीयांचे कौतुक केल्या जात आहे.

COMMENTS