कोरोनासह स्वाईन फ्लूचीही होणार तपासणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनासह स्वाईन फ्लूचीही होणार तपासणी

मनपासह जिल्हा आरोग्य प्रशासनाला सूचना

अहमदनगर/प्रतिनिधी : प्रत्येक फ्लू सदृश्य रुग्णांची कोविड सोबतच स्वाईन फ्लू (इन्फल्यूएंझा) तपासणी देखील करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य प्रशासन व महापालिक

राहुरीत गोल्डन ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार
भाजपच्या हाती धतुरा…शिवसेना-राष्ट्रवादी झाले एकत्र ; नगर महापौर निवडणूक एकत़र्फी होणार
कर्जत तालुक्यात खुलेआम चालते गावठी दारूची वाहतूक

अहमदनगर/प्रतिनिधी : प्रत्येक फ्लू सदृश्य रुग्णांची कोविड सोबतच स्वाईन फ्लू (इन्फल्यूएंझा) तपासणी देखील करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य प्रशासन व महापालिका आरोग्य विभागाला शासनाद्वारे दिले गेले आहेत. राज्यात इन्फल्यूएंझा एएच 1 एन 1 (स्वाईन फ्लू) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 1 जानेवारी ते 20 जुलै या काळात राज्यात 81 बाधित रुग्ण आढळले व यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने यापुढे फ्लू सदृश्य रुग्णांची तपासणी करताना कोरोना तपासणीसह स्वाईन फ्लू तपासणी करण्याचेही सांगण्यात आले आहे. स्वाईन फ्लूचे रुग्ण पावसाळ्यात प्रामुख्याने आढळतात. या वर्षीच्या पावसाळ्यात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करीत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने विशेष उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य प्रशासन व महापालिकेला दिले आहेत. जिल्ह्यात फ्लूू सदृश्य रुग्णांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. सौम्य फ्लू रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे व त्यांच्याशी संपर्क आलेल्यांचा शोध घेण्यासह या सर्वांवर उपचार ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य संस्थामध्ये फ्ल्ू सर्वेक्षणाचे काम नियमितपणे करावे. इन्फल्यूएंझा सर्वेक्षणात फल्यू सदृश्य रुग्णांच्या सर्वेक्षणासोबतच तीव्र श्‍वसनदाह असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षणही करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

असे करावेत उपचार
कोरोनाची रुग्ण संख्या मध्यंतरी कमी झाली होती. पण आता ती पुन्हा वाढू लागली आहे. यात आता स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन त्यापैकी फ्लू सदृश्य लक्षणे असणार्‍यांना उपचार द्यावेत. इन्फल्युएंझा ए एच 1 एन 1 चा अधिशयन कालावधी हा 1 ते 7 दिवसांचा आहे. लक्षणे आढळून येण्याच्या एक दिवस आधीपासून ते लक्षणे आढळल्यानंतर पुढील 7 दिवसांपर्यंत इन्फल्युएंझा ए एच 1 एन 1 चा रुग्ण सहवासात असणार्‍या व्यक्तींना संसर्ग संक्रमित करु शकतो. त्यामुळे या कालावधीत इन्फल्यूएंझा ए एच 1 एन 1 बाधित रुग्णांच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या निकट सहवासितांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. स्वाईन फ्लूसह इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराच्या साथीला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी कार्यक्षेत्रातील 50 आणि 100 खाटांची उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, अति विशेषज्ञ रुग्णालये, संसर्गजन्य आजार नियंत्रण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये या ठिकाणी स्वाईन फ्ल्ू रुग्णांच्या प्रयोगशाळा नमुने संकलन आणि उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवावी. निवडण्यात आलेली अशी रुग्णालये आणि जिल्ह्यातील एकूण तालुके, त्यांच्यातील भौगोलिक अंतर या सर्व घटकांचा विचार करून प्रत्येक रुग्णालयास जोडण्यात आलेले तालुके निश्‍चित करावेत, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.

रोज आढावा घेणार
कोविडप्रमाणेच स्वाईन फ्लू रुग्णांबाबतचा अहवाल दररोज पाठविण्याचे निर्देशही आरोग्य विभागाचे सहसंचालक स्वप्नील लाळे यांनी दिले आहेत. स्वाईन फ्लू उपचारासाठी निवडण्यात रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करावेत, या कक्षात 2 खाटांमध्ये 6 फुटाचे अंतर असावे, येथील वायुविजन व्यवस्थित असावे, कक्षास एक्झॉस्ट फॅन असावा, ऑक्सिजन सिलींडर, सक्शन मशीन, इमर्जन्सी ट्रे, व्हेन्टीलेटर्स आदी उपकरणे, प्रशिक्षित स्टाफ व यंत्रणा असाव्यात, कक्षामध्ये जंतुप्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विलगीकरण कक्षासाठी ऑनकॉल फिजीशियन 24 तास उपलब्ध असावा, स्वाईन फ्लूसाठी लागणारी औषधे आणि इतर बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असाव्यात. सेवेसाठी रुग्णवाहिका कार्यरत असावी, अशाही अनुषंगिक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचे 82 रुग्ण
जिल्ह्यात मध्यंतरी कोरोनाची रुग्ण संख्या घटली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून ती वाढली आहे. रविवारी कोरोनाची रुग्णसंख्या 82 होती व त्यापैकी सर्वाधिक 24 पारनेरला सापडले. याशिवाय पाथर्डीला 14 व नगर शहरात 10 रुग्ण आढळले. संगमनेरला 7, भिंगार व राहात्याला प्रत्येकी 5, नगर तालुका व नेवासाला प्रत्येकी 3, शेवगाव, राहुरी व छावणी रुग्णालयात प्रत्येकी 2 आणि अकोले, कोपरगाव, श्रीगोंदे व श्रीरामपूर येथे प्रत्येकी एकजण सापडला. विशेष म्हणजे कर्जत व जामखेडला एकही रुग्ण सापडला नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कोरोना नियंत्रणात असला तरी मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये व नगर शहर व जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचे प्रमाण काही प्रमाणात का होईना, पण वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच आता राज्य शासनाने स्वाइन फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

COMMENTS