यवतमाळ प्रतिनिधी- वणी येथील श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत सभासदांच्या जवळपास 700 कोटी रुपयांच्या ठेवी आहे. अध्यक्ष व संचालकांच्या अना
यवतमाळ प्रतिनिधी- वणी येथील श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत सभासदांच्या जवळपास 700 कोटी रुपयांच्या ठेवी आहे. अध्यक्ष व संचालकांच्या अनागोंदी व अमर्याद कर्जवाटपामुळे ठेवी धोक्यात आल्या आहेत. या पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असुन आरोप पाच खातेदारांनी केला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सहकारमंत्र्यांकडे दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली.
पतसंस्थेने एका प्रकरणात इंडस्ट्रीज झोनवरील जमिनीवर ले-आउट मंजूर नसताना पाच कोटींचे कर्ज दिले. काही वर्षांपूर्वी पतसंस्थेने रंगनाथ चेंबरची तीन मजली इमारत तीन कोटी 16 लाख 696 रुपयात विकत घेतली. मात्र, अजूनपर्यंत त्याची खरेदी करण्यात आली नाही. प्रत्यक्षात रक्कम जागा मालकाला अदा करण्यात आली आहे. पतसंस्थेने आणखी एका कर्ज दाराशी संगणमत करून मित्र परिवार व नातेवाइकांनी 70 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केल्याचा आरोपही खातेदारांनी केला आहे.
COMMENTS