राज्य सरकारच्या ताफ्यातील सर्वच वाहने असणार इलेक्ट्रिक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सरकारच्या ताफ्यातील सर्वच वाहने असणार इलेक्ट्रिक

मुंबई/प्रतिनिधी : पर्यावरणाच्या दृष्टीने राज्य सरकारन महत्वाचा निर्णय घेत, यापुढे राज्य सरकारच्या ताफ्यातील सर्वच वाहने इलेक्ट्रिक असणार आहे. पर्यावर

प्राचार्य डॉ.गावित यांनी मराठी संशोधन विभागाला उपक्रमशील गुणवत्ता दिली ः डॉ. बाबुराव उपाध्ये
काझी गढीच्या संरक्षण भिंतीचे काम आठ दिवसात सुरु करावे अन्यथा जन आंदोलन करू
शेजारच्याने गळफास घेतल्याचे पाहून चिमुकल्याने ही घेतला गळफास I LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी : पर्यावरणाच्या दृष्टीने राज्य सरकारन महत्वाचा निर्णय घेत, यापुढे राज्य सरकारच्या ताफ्यातील सर्वच वाहने इलेक्ट्रिक असणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून होणार आहे. डिझेल-पेट्रोलवर चालणार्‍या वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी हा निर्णय पर्यावरण खात्याकडून घेण्यात आला आहे . राज्यातील प्रदुषण रोखण्याठी पर्यावण मंत्रालयाकडून सध्या ठोस पावलं उचलण्यात येत आहे. मागील काही वर्षात पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडूनही देशपातळीवरही प्रदुषण रोखण्यासाठी मोठे निर्णय घेण्यात येत आहेत.
कायमस्वरूपी विकासाची देशात काही उद्दिष्टे देण्यात आली आहेत. यामध्ये पर्यावरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाने माझी वसुंधरा हे अभियान राबविले. या अभियाना अंतर्गत दीड कोटी नागरिकांनी पर्यावरणपूरक गोष्टी अंगिकारण्यासाठी ई-शपथ घेतली. शिक्षणात माझी वसुंधरा हा अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. राखीव वनक्षेत्र, वृक्ष कायद्यात सुधारणा, इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021, आरे जंगलातील 808 एकर वनाचे संरक्षण, 24 हजार 179 एकर पेक्षा जास्त खारफुटीचे संरक्षण, 43 अमृत शहरांचा रेस टू झिरो मध्ये सहभाग आदी उपक्रम राबवण्यात येत आहे. जागतिक तापमान वाढीमूळे अतिवृष्टी, चक्रीवादळ, उष्णतेची लाट, तीव्र दुष्काळ, वणवे, बर्फाचे आवरण कमी होणे, समुद्राच्या पातळीत वाढ यांचा समावेश आहे. जगात तापमानवाढ झाल्यास त्याचे परिणाम महाराष्ट्रासारख्या उष्ण कटिबंधावर देखील सर्वाधिक जाणवतील. भविष्यात मुंबई, कोकणचा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. राज्याच्या काही भागात तीव्र दुष्काळ निर्माण होऊ शकतो. जंगलांतील वणवे हे कार्बन उत्सर्जनाचे स्त्रोत बनतील. त्यामुळे प्रदूषाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS