Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी

इस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी काळात येऊ घातलेल्या पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरपालिका, ग्रामपंचायती, सहकारी संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर इस्ला

घरफोडीच्या गुन्ह्यांमधील 11 लाखांचे दागिने जप्त
जिल्हा परिषदेच्या पेट्री शाळेत इंग्रजीचे धडे
अनैतिक संबंधांत अडसर ठरणार्‍या बालकाची प्रियकराच्या मदतीने आईनेच संपवले

इस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी काळात येऊ घातलेल्या पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरपालिका, ग्रामपंचायती, सहकारी संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर इस्लामपूर विधानसभा महाडिक कुटुंबाच्या बरोबर राहून लढणार आहे. वाळवा तालुक्यामध्ये नायकवडी व महाडिक कुटुंबाची ताकद खूप मोठी आहे. या ताकतीचा उपयोग कार्यकर्त्यांना येणार्‍या काळात बळ देण्यासाठी करणार असल्याचेही हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख वैभव काका नायकवडी यांनी सांगितले.
पेठ नाका येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी राहुल महाडिक यांची निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
वैभव काका नायकवडी म्हणाले, राहुल महाडिक यांच्या निवडीने युवकांच्यात नवचैतन्य निर्माण झालेले आहे सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक युवक काम करण्यास इच्छुक असतात. त्यांना राहुलदादा नक्कीच न्याय देतील.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्य समिती सदस्य सम्राट महाडिक, बाळासाहेब पाटील, अरुण यादव, भगवानराव पाटील, दिनकर बाबर, दिलीप पाटील यांच्यासह हुतात्मा संकुलाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

COMMENTS