Homeताज्या बातम्यासंपादकीय

डिजिटल अरेस्टच्या घटना चिंताजनक !

देशामध्ये डिजिटल युग दुधारी शस्त्र ठरतांना दिसून येत आहे. एकीकडे या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवी जीवन सुखकर होतांना दिसून येत आहे. फोन पे, गुग

शपथविधीच्या निमित्ताने ..
राजकीय घडामोडींना वेग
काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?

देशामध्ये डिजिटल युग दुधारी शस्त्र ठरतांना दिसून येत आहे. एकीकडे या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवी जीवन सुखकर होतांना दिसून येत आहे. फोन पे, गुगल पे, युपीआयसारख्या माध्यमातून एका क्षणात आपण पेमेंट करू शकतो. शिवाय कुठेही आणि कुणालाही कुठल्याही अडचणीशिवाय बिल, रक्कम, पैसे पाठवू शकतो. मात्र याचा गैरवापर देखील मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे. अलीकडच्या काही महिन्यापासून डिजिटल अरेस्टसारख्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतांना दिसून येत आहे.
डिजिटल अरेस्ट हा एक सायबर फ्रॉडचा नवा प्रकार आहे. यात सायबर भामटे आपल्याला पोलिस अधिकारी, सीबीआय, ईडी, कस्टम किंवा इन्कम टॅक्स वा अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत पीडीत व्यक्तीला कॉल करतात. त्यानंतर त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबियांवर अनैतिक कामात सामील असल्याचा आरोप करतात. त्यानंतर फ्रॉड करणारे व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करतात. साधा कॉल अथवा व्हिडीओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवतात. नंतर पीडीत व्यक्तीला खोटी कागदपत्रे दाखवून किंवा खोटे ओळखपत्र दाखवून घाबरवले जाते. त्यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी दबाव टाकला जातो. बरं हा दंड किंवा रक्कम हजारोच्या नाही तर लाखो आणि कोट्यावधींच्या घरात असल्याचे दिसून येते. त्यामुळे डिजिटल अरेस्टपासून वाचण्यासाठी अनेकजण आपल्याजवळची आपली संपूर्ण जमापूंजी या खोटारड्या अधिकार्‍याच्या हातात देवून मोकळे होतात. बरं ही डिजिट अरेस्ट महाराष्ट्रातून होत नाही, तर ती पश्‍चिम बंगाल, बिहार, ओरिसा, छत्तीसगड यासारख्या राज्यातून किंवा कंबोडियासह इतर राज्यांतून होतांना दिसून येते. कोट्यावधी रक्कम उकळल्यानंतर तो मोबाईल नंबर बंद करून ठेवला जातो, किंवा त्याची विल्हेवाट लावली जाते. ज्यामुळे अशा गुन्हेगारांना अटक करणे अवघड जाते. परराज्यातील किंवा परदेशातील गुन्हेगार असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास बराच अवधी लागतो, कधी-कधी असे गुंड हाती देखील लागत नाही. त्यामुळे अनेक जण आपली जमापुंजी अशा गुंडांना देवून आपले आयुष्य धोक्यात टाकतांना दिसून येत आहे. यामागच्या अनेक बाबी कारणीभूत आहेत. खरंतर आपण गुन्हा केलाच नाही, तर घाबरण्याचे काही कारण नाही. मात्र ज्या व्यक्तींना टार्गेट केले जाते, त्यांच्याकडे एकतर भरपूर पैसे असतात, किंवा त्यांचे हात कुठेतरी अडकलेले असतात, त्यामुळे त्यांच्या मनात एकप्रकारची भीती असते. त्यामुळे त्यातून वाचण्यासाठी पैसे दिले जातात. त्यामुळे कुठल्याही लोभाला बळी पडण्याऐवजी आणि कुठल्याली डिजिटल अरेस्टला बळी पडण्याऐवजी त्याची खात्री करण्याची खरी गरज आहे. जर तुम्हाला डिजिटल अरेस्ट म्हणजे कळले असेल तर वास्तविक ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणती गोष्ट नसते. या धमक्या संपूर्णपणे तोतयागिरी असते. त्यांचा हेतू पीडीत व्यक्तीकडून लवकरात लवकर ऑनलाईन मार्गे पैसे लुबाडण्याचा असतो. त्यामुळे पोलिस असल्याची बतावणी करुन पीडीत व्यक्तीला घाबरवले जाते. आणि तणावाखाली आणले जाते. त्यातून ही व्यक्ती आपली संपूर्ण जमापूंजी गमावून बसते. त्यामुळे आयुष्यातील संपूर्ण जमापूंजी अशा तोतयागिरीला देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी सतर्क राहण्याची खरी गरज आहे. यासोबतच शेअर बाजारात गुंतवणूक करा, तुम्हाला जास्त परतावा देतो, असे आमिष दाखूवन फसवणूक करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात काही दिवसांपासून तुम्ही वीजबील भरले नाही, वीज बील आत्ताच ऑनलाईन भर अन्यथा तुमची वीजबील कपात करण्यात येईल असा इशारा दिला जातो. आणि बील भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये एक अ‍ॅप डाऊनलोड करा, नंतर बिल पे करा असे सांगून आपण आपल्या मोबाईलचा संपूर्ण अ‍ॅक्सेस त्यांच्या तावडीत देतो आणि आपले खाते रिकामे होते. वास्तविक पाहता महावितरणचे कुठेही कॉलसेंटर नाही. असे असतांना असे फोन येणारे, मॅसेज करणारे फ्रॉड असतात, त्यामुळे खात्री करण्याची गरज असते, आणि आपण ती करत नाही. त्यामुळे अशा घटनांमुळे अनेकांचे खाते रिकामे झाल्याचे दिसून येत आहे. यातून सावरण्याची खरी गरज आहे.

COMMENTS