अल खिदमाह हॉस्पिटलमध्ये गोर गरिबांसाठी मोफत औषध उपचार होणार –   खासदार इम्तियाज जलील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल खिदमाह हॉस्पिटलमध्ये गोर गरिबांसाठी मोफत औषध उपचार होणार –   खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद शहरात सामान्य नागरिकांसाठी फार कमी शुल्का मध्ये या दवाखान्यामध्ये डिलिव्हरी होणार असून हे गरिबांच्या करता चांगली गोष

छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या स्कूल बसला आग
डॉक्टर प्रेयसीवर सर्जिकल ब्लेडने हल्ला
वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूरात भिषण गोळीबार

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद शहरात सामान्य नागरिकांसाठी फार कमी शुल्का मध्ये या दवाखान्यामध्ये डिलिव्हरी होणार असून हे गरिबांच्या करता चांगली गोष्ट आहे याचे मी स्वागत करतोय इतर जे काही आजार असतील ते पण येथे कमी खर्चात होतील आणि असे दवाखाने शहरात उघडणे गरजेचे असल्याचे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं या दवाखान्यातील जे भागिदार आहे त्यांनी सांगितलं आम्ही कोणाकडून पैसे घेणार नाही आणि कोणाकडे मागणार नाही त्यामुळे मी याच स्वागत करतो आणि ह्या ग्रुप साठी मी माझ्यातर्फे एक ॲम्बुलन्स यांना देत आहे.शहागंज मधील शासकीय रुग्णालय बाबत मी कालच माहिती घेतली की  मीटिंगमध्ये पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका ची जागा आहे जो दवाखाना बनण्याचे काम चालू आहे ते घाटी हॉस्पिटलच्या अंतर्गत येत आहे त्या बाजूला जी जागा आहे ती तुमच्या कामाची नाही हे मी महानगरपालिकेचे लक्षात आणून दिले आणि ती जागा या कामासाठी द्या असे त्यांना म्हणले व त्यांनी ती जागा दिली आता एनओसी भेटल्यानंतर या ठिकाणी चार-पाच मजली इमारत राहणार आहे आणि ती प्रस्तुती ग्रहासाठीच उपयोगात आणावे हे मी पालकमंत्र्यांना सुद्धा सांगितले असल्याचे खासदार जलील या प्रसंगी म्हणाले दूध डेरी येथील हॉस्पिटल जे आहे ते 200 खाटांचे हॉस्पिटलचे होतं पण काही फंडिंग काही निधीचं प्रॉब्लेम येत असल्यामुळे थोडं काम धीम्या गतीने सुरू असून आता 400 खाटांचे हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील बोलले

COMMENTS