Homeताज्या बातम्यादेश

अखिलेश यादव सोडणार विधानसभेची जागा

लखनऊ ः कन्नौजमधून खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी करहाल विधानसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांसोबत झालेल्या बैठ

उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकीलपदी फेरनियुक्ती
81 व्या औंध संगीत महोत्सवास दिमाखात प्रारंभ
चाचण्याही करणे अनिवार्य

लखनऊ ः कन्नौजमधून खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी करहाल विधानसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर शनिवारी लखनऊमध्ये त्यांनी ही घोषणा केली. म्हणजेच आता अखिलेश यादव हे दिल्लीचे राजकारण करणार आहेत. अखिलेश यांनी 2022 मध्ये मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विजयानंतर त्यांनी आझमगडच्या खासदारकीचा राजीनामा दिला. आझमगढमध्ये पोटनिवडणूक झाली, त्यात भाजपचे दिनेश लाल यादव निरहुआ विजयी झाले.

COMMENTS