Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरटाकळी येथे अखंड हरिनाम सप्ताहास 23 ला  प्रारंभ  

शहरटाकळी/प्रतिनिधी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही रघुनाथ महाराज उंबरेकर,वै.अंबादास महाराज क्षीरसागर  व गुरुवर्य भास्कर

*VIRAL सत्य की असत्य : 5G टॉवरसाठी देशात Corona आणि Lockdown चे नाटक ? काय आहे सरकारची खेळी ? | LokNews24*
विखेंच्या नाकाखालील डोंगर पोखरला, खासदार झाले संतप्त
अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला

शहरटाकळी/प्रतिनिधी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही रघुनाथ महाराज उंबरेकर,वै.अंबादास महाराज क्षीरसागर  व गुरुवर्य भास्करगिरी महाराज (देवगड),यांच्या कृपाशीर्वादाने  ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांच्या प्रेरणेने व ह.भ.प. शिवाजीराव मडके     यांच्या मार्गदर्शनाखाली  बुधवार दि.23 ऑगस्ट ते बुधवार दि.30 ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.
सप्ताह कालावधीत पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सायंकाळी 6ते 7 हरिपाठ,व रोज संध्याकाळी 9 ते 11 हरीकिर्तन होईल. बुधवार दि.23 रोजी उद्धव महाराज सबलस (वडुळे), गुरुवार दि.24 शिवाजी महाराज देशमुख (श्रीक्षेत्र नेवासा),शुक्रवार दि.25, मदन महाराज वर्पे (संगमनेर), शनिवार दि.26 महेश महाराज मडके (शहरटाकळीकर), रविवार दि.26 देविदास महाराज म्हस्के  (गुरुकुल आश्रम हिंगणगाव), सोमवार दि.27 जगन्नाथ महाराज शास्त्री (जगदंबा गड), मंगळवार दि.28श्रीपाद महाराज भंडगे(सोलापूर) यांचे हरिकीर्तन होणार असून, बुधवार दि.11रोजी सकाळी 9ते 11 ह भ प श्रीपाद महाराज भंडगे यांचे अमृततुल्य वाणीतून काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर स्वर्गीय बबनराव मडके पा.यांच्या स्मरणार्थ , अ‍ॅड.अनिल मडके ( मा.सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती)  यांच्या वतीने काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.तरी  पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

COMMENTS