Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील 350 बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे

मुंबई पालिकेचा निर्णय, आणखी सहा उपाययोजना

मुंबई : मुंबईचा कोंडलेला श्‍वास मोकळा करून मुंबईकरांना शुद्ध हवा उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरूवात केली आ

श्री साईपावन प्रतिष्ठानच्या नेत्र तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद
अहमदनगरचे जिल्हाधिकारी झारीतील शुक्राचार्य…
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी नागपुरस्थित दोन संचालकांना कारावास

मुंबई : मुंबईचा कोंडलेला श्‍वास मोकळा करून मुंबईकरांना शुद्ध हवा उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत धावणार्‍या 350 बसगाडयांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार असून,  सहा उपाययोजना करण्यात येणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. मुंबईत सुरू असलेली विकासकामे, इमारतींची बांधकामे, वाहनांचा धूर, कारखान्यातून निघणारा धूर आदींमुळे मुंबईकरांना श्‍वास घेणे अवघड झाले आहे. पालिकेने बांधकाम व्यावसायिकांसह संबंधितांना मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. मात्र, या उपाययोजनांचा अद्याप फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हवा शुद्धीकरणासाठी पालिकेने आणखी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आयआयटी, मुंबईची मदत घेणार आहे. आयआयटीकडून हवा शुद्धीकरणासाठी प्रायोगिक तत्वावर 6 यंत्रे मागविण्यात येणार आहेत. मुंबईत धावणार्‍या 350 बसगाडयांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार असून, यापैकी 150 बसगाडयावर ही यंत्रे बसविण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. वायू या कंपनीने तयार केलेले पदपथावरील दिवे 50 ठिकाणी कार्यान्वित केले जाणार असून, या दिव्यांमध्ये हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. चेंबूर येथील डायमंड गार्डन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे हे दिवे बसवले जातील.

COMMENTS