Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट ’

मुंबई : समुद्री वार्‍यांचा वेग मंदावल्यामुळे वातावरणातील धूळ, धूर आणि धुक्याचे मिश्रण म्हणजेच धुरक्याचे प्रमाण वाढले असून हवेत तरंगणार्‍या अतिसूक

श्रीगोंद्यात आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दुसऱ्या साक्षीदाराची साक्ष
श्री सिद्धिविनायक शाळेतील बौद्धिक अक्षम – बहुविकलांग मुलांसमवेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

मुंबई : समुद्री वार्‍यांचा वेग मंदावल्यामुळे वातावरणातील धूळ, धूर आणि धुक्याचे मिश्रण म्हणजेच धुरक्याचे प्रमाण वाढले असून हवेत तरंगणार्‍या अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर) प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे दिल्लीसारखी मुंबईच्या हवेची अवस्था झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 309 असा नोंदवण्यात आला असून राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांनुसार (एनएएक्यूएस) हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ असल्याचे सूचक आहे.
नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला तापमानात कमालीचा बदल झाला. सध्या किमान आणि कमाल तापमान वाढले असले तरी समुद्री वार्‍याची गती कमी असल्याने धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. ही परिस्थिती गेल्या तीन दिवसांपासून असल्याने मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावरील तीन दिवसांच्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ पातळीवर असल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील सुमारे सहा केंद्रांवर प्रति घनमीटरमध्ये अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (पी.एम. 2.5) 300 पेक्षाही अधिक असल्याची नोंद मंगळवारी झाली. माझगाव येथे हवेचा दर्जा सर्वात खालावलेला (385 एक्यूआय) असल्याचे नोंदवण्यात आले. सध्या दिल्लीमधील हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण 329 असून हे प्रमाण मुंबईच्या तुलनेने 20 ने कमी आहे.

COMMENTS