Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऐन दिवाळीत ऊसदरासाठी रस्त्यावर उतरू; शेतकरी संघटनांचा इशारा

सातारा / प्रतिनिधी : कारखानदारांनी ऊसदर जाहीर करावा, एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी शेतकर्‍यांना पैसे मिळावेत, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात का

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले
फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचा राजीनामा

सातारा / प्रतिनिधी : कारखानदारांनी ऊसदर जाहीर करावा, एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी शेतकर्‍यांना पैसे मिळावेत, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार व शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांत बैठक झाली. दरम्यान, बैठकीत कारखानदारांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने ऊसदर बैठक निष्फळ ठरल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला. बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने ऐन दिवाळीत सर्व शेतकर्‍यांना बरोबर घेऊन एकजुटीने रस्त्यावर उतरून तीव्र लढा देण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार व शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी यांच्यात बैठक आयोजित केली होती. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, बळीराजा संघटनेचे पंजाबराव पाटील, साजिद मुल्ला, रयत संघटनेचे सोनू साबळे, मधुकर जाधव, अर्जुन साळुंखे, धनंजय महामुलकर, दादासाहेब यादव, अ‍ॅड. विजय चव्हाण, रमेश पिसाळ, शरद जोशी शेतकरी संघटना व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मागील देय रक्कम व एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदारांनी नकार देऊन शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. पुढील काळात शेतकरी संघटना कारखान्यांचे गाळप बंद करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत कारखानदार व प्रशासन शेतकर्‍यांना न्याय देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाने हात वर करून शेतकर्‍यांना उघड्यावर टाकले. मात्र, जिल्ह्यातील जे कारखानदार एकरकमी ऊसदर देणार नाहीत अथवा जाहीर करणार नाहीत, अशा कारखान्यांविरोधात सर्व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
सहकारमंत्र्यांच्या दारात आंदोलन
सातारा जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी मागील हंगामातील संपूर्ण ऊस बिलांची रक्कम शेतकर्‍यांना दिली नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक केली आहे. आजच्या बैठकीत जिल्ह्यातील रयत व न्यू फलटण शुगर वर्कस हे दोन कारखाने वगळता इतरांनी एकरकमी एफआरपी देण्यास विरोध केला. त्यामुळे ऐन दिवाळीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सर्व कारखानदार व संचालकांच्या दारात बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला.

COMMENTS