Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरच्या नरेंद्र कुदळेची राष्ट्रीय पातळीवर निवड

अहमदनगर ः पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या मान्यतेने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशने 1 मे ते 3 मे 2024 रोजी 5 व्या वेस्ट झोन पिंच्याक सिलॅट स्पर्धा

कोपरगाव आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन
सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुलीसाठी पोलिस सरंक्षण द्या
छत्रपती संभाजी महाराजांनी समाज उभारणीचे काम केले ः आ. गडाख

अहमदनगर ः पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या मान्यतेने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशने 1 मे ते 3 मे 2024 रोजी 5 व्या वेस्ट झोन पिंच्याक सिलॅट स्पर्धा 2024 सर्व वयोगटातील मुलां मुलीसाठी सेंट पिटर स्कूल पाचगणी येथे अयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये यजमान महाराष्ट्र, गोव, गुजरात, दादरा नगर हवेली, दमण आणि दिव, मध्यप्रदेश, राजस्थान या विविध राज्यातील 300 खेळाडू सहभागी झाले . अहमदनगर जिल्ह्याकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी करत नरेंद्र विलास कुदळे या खेळाडूने सुवर्णपदक प्राप्त केले.
पिंच्याक सिलॅट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट खेळ प्रकार असून (1) फाईट) (2) (क) (3) रेगु (ग्रुप काता) (4) गंडा (डेमो फाईट) सोलो (क्रिएटिविटी) या पाच प्रकारात खेळला जातो. समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या 5% राखिव नोकर भरतीमध्ये केला आहे.  या खेळाला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्‍वविद्यालय संघ अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑलिम्पिक कांऊमिल ऑफ एशियाची मान्यता आहे. या खेळाचा समावेश गोव्यामध्ये झालेल्या 37 व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 14 मे 2023 रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला होता. या यशस्वी खेळाडूला अहमदनगर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष तसे संस्कार स्पोर्ट्स क्लब मुख्य प्रशिक्षण प्रवीण कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले. विजय खेळाडूचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

COMMENTS