Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर बंदची आज मराठा समाजाकडून हाक

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ उतरणार रस्त्यावर

अहमदनगर : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे गेल्या 6 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या या आ

पुण्यात ऑनलाइन क्लासमध्ये अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडिओ l DAINIK LOKMNTHAN
सकाळीच कोणीतरी कोणतीही झंजट मागे लावील…; इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केला उद्वेग
विठ्ठल भुसारी यांची मंत्रालयात लिपिकपदी निवड

अहमदनगर : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे गेल्या 6 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या या आमरण उपोषनाच्या समर्थनार्थ विविध जिल्ह्यात आंदोलन आमरण सुरू आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने बीड बंदची हाकल दिल्यानंतर जालना जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगरमध्ये देखील मराठा समाजाने सोमवारी 23 मार्च रोजी अहमदनगर बंदची हाक देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारीअहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अहमदनगर तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून मराठा बांधवांनी आमरण उपोषण देखील सुरू आहे. सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा, हैदराबाद गॅझेट लागू करा, सातारा गॅझेट लागू करा, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करा, मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असून, त्याच पार्श्‍वभूमीवर सोमवारी विविध जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून अहमदनगर जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आव्हान देत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा रविवारी 4 था दिवस होता. वडगोद्री येथे हाकेंनी उपोषण सुरू केल्यामुळे जालना जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, मराठा समाजाने जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानंतर, परभणी आणि पुणे जिल्ह्यातही मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. आता, सकल मराठा समाजाकडून अहमदनगर जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे.    

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस – मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आपला लढा तीव्र केला असून, त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सोमवारी सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असली तरी मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ जिल्हा-जिल्ह्यात आंदोलन तीव्र करण्यात येत आहे.

संभाजीनगरमध्ये केला रास्ता रोको – मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी 22 सप्टेंबर रोजी जिजाऊ चौकात सव्वा तास रास्ता रोको केला. यावेळी दोन किमी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांच्या रांगा वाढत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली. त्यामुळे आंदोलन आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेत रस्ता रोको आंदोलन थांबवले.

COMMENTS