Ahmednagar : नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल (Video)

Homeमहाराष्ट्रशहरं

Ahmednagar : नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल (Video)

अहमदनगर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक मुदस्सर जहांगीर शेख यांच्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे . नगर-औरं

12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा
महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप
आमदार संग्राम जगतापांना झोपेतही माझा चेहरा दिसतो… किरण काळेंचा घणाघात

अहमदनगर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक मुदस्सर जहांगीर शेख यांच्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे . नगर-औरंगाबाद महामार्गावरील सनी पॅलेस समोर राहत असलेल्या पठाण कुटुंबीयांच्या वतीने हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.  हयात खान ,दिलावर खान ,पठाण आयुब खान,  बशीर खान पठाण, शाहरुख पठाण यांनी नगरसेवक मुदस्सर शेख यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला आहे.  पठाण कुटुंबीयांच्या वडिलोपार्जित जागेत नगरसेवक मुदस्सर शेख हे कारण नसताना हस्तक्षेप करत असून सदर जागेतील 12 एकर जागा तात्काळ मोकळी करावी . अशी धमकी नगरसेवक मुदस्सर शेख यांनी पठाण यांच्या घरी येऊन दिली असल्याची माहिती तक्रारदार यांनी दिली असून नगरसेवक मुदस्सर शेख यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी . अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे

COMMENTS