Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सवाई गंधर्व महोत्सवात अहिल्यानगरची कन्या आदितीचे सूर निनादणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) - संगीताची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सवाई गंधर्व महोत्सवात अहिल्यानगरची कन्या आदिती गराडे हिचे सूर निनादणार आहे. या म

खामगाव जिल्हा परिषद शाळा तालुक्यात प्रथम
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त कोपरगावमध्ये शांतता समिती बैठक उत्साहात
गुणवत्ता हीच भविष्याची खरी श्रीमंती होय : डॉ. बाबुराव उपाध्ये

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – संगीताची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सवाई गंधर्व महोत्सवात अहिल्यानगरची कन्या आदिती गराडे हिचे सूर निनादणार आहे. या महोत्सवात हार्मोनियम वादन करण्याचा बहुमान मिळालेली ती जिल्ह्यातील आजपर्यंतची पहिलीच महिला वादक ठरली आहे. पुण्यात 18 ते 22 डिसेंबर या दरम्यान सवाई गंधर्व महोत्सव होत आहे. त्यात 20 डिसेंबर रोजी होणार्‍या सांगितीक कार्यक्रमात आदिती हार्मोनियम वादन करणार आहे. ही नगरकरांच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची बाब आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरू झालेल्या आदितीच्या सांगितिक प्रवासात तिला रोहिणी कुलकर्णी, संपदा चौधरी, कुमुदिनी बोपर्डीकर, धनश्री खरवंडीकर आणि प्रमोद मराठे यांसारख्या दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन लाभलेे आहे. या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सातत्याने घेतलेले कष्ट यामुळेच तिच्या या प्रवासाचा आलेख उंचावत गेला. अत्यंत प्रगल्भ संवादिनी वादक म्हणून आदितीने अल्पावधीतच अनेक  मान्यवरांचा विश्वास संपादन केलो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेल्या अनेक प्रसिद्ध गायकांसोबत संवादिनीची साथ करण्याचा बहुमान तिला मिळालेला आहे. आजवर आदितीला अनेक पुरस्कार मिळालेले असून दूरदर्शनवरील संगीत सम्राट या मालिकेतही ती झळकली होती. आदिती ही अहिल्यानगरमधील रमेश हार्मोनियमचे संस्थापक, भजन सम्राट आणि प्रसिद्ध हार्मोनियम मेकर व वादक आनंदराव रंगनाथ गराडे आणि महावितरणचे निवृत्त अधिकारी मधुकर रामदास सांबरे यांची नात असून रेणावीकर विद्या मंदिरमधील शिक्षिका स्वाती दत्तात्रय गराडे यांची कन्या आहे. आदितीला मिळालेल्या या बहुमानाबद्दल संगीत क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनीही तिचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS