वाकडीतील सर्वपक्षीय लढा यशस्वी राहाता प्रतिनिधी--राहाता तालुक्यातील वाकडी येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे स्थलांतर थांबवण्यास ग्रामस्थांना मो
वाकडीतील सर्वपक्षीय लढा यशस्वी
राहाता प्रतिनिधी–राहाता तालुक्यातील वाकडी येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे स्थलांतर थांबवण्यास ग्रामस्थांना मोठे यश आले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे स्थलांतर होऊ नये यासाठी वाकडी गावातील ग्रामस्थांनी मोठी पराक्रष्ट करून त्यांच्या मागणीला मोठे यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे चितळी गावात मध्ये होणार बँकेचे स्थलांतर चितळी येथे होऊ नये.यासाठी वाकडी ग्रामस्थांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे झोनल ऑफिस अहिल्यानगर येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब कोते,बाबासाहेब शेळके,रवींद्र शेळके,रमेश विठ्ठल लहारे आदी ग्रामस्थांनी जाऊन निवेदन दिले होते.
वाकडी गावातील ग्रामस्थांच्या वतीने दि ३०जून रोजी ग्रामस्थांना आपण दि ३० रोजी आमरण उपोषण करणार आहे ते करू नका आम्ही दि १ तारखेला आमचे पथक वाकडी गावात नागरिकांची खातेदारांची चर्चा करण्यासाठी येतो.असे बँक अधिकाऱ्यांनी असे सांगून उपोषण स्थगित केले होते.
एक जुलै रोजी बँक अधिकारी वाकडीत आले असता घेतलेल्या मीटिंगमध्ये कोणत्याही परिस्थितीत बँक स्थलांतर होणार हे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
वाकडी गावातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब कोते हे कोपरगावचे आमदार अशितोष काळे यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांनी हा विषय कोपरगावचे आमदार काळे यांना सांगितला. याबाबत आमदार काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द दिला.
त्याच अनुसरून मुंबई येथे पावसाळी अधिवेशन चालू असताना आमदार काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर वाकडी येथील बँक दुसऱ्या गावात स्थलांतर करू नये. याबाबत चर्चा करण्यात आली.या चर्चा दरम्यान वाकडी गावातील बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकारी यांना बँक स्थलांतर करू नये. असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ही बातमी आमदार काळे यांचे समर्थक अण्णासाहेब कोते यांनी वाकडी गावातील सर्व ग्रामस्थ यांना सांगितले. बँकेचे स्थलांतर थांबवण्यात आले आसून आपले व्यवहार चालू ठेवावे असे सांगितल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा आनंद साजरा करण्यात आला.
तसेच ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,माजी खासदार सुजय विखे ,शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच आमदार काळे, यांचेही वाकडी गावातील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे.
(गावातील एक इंग्लंड रिटर्न मुंबई येथे स्थित असलेला युवक महेश लबडे यांनी पंतप्रधान कार्यालयात ऑनलाईन तक्रार रजिस्टर केली, त्यात गावातील भविष्यात होणाऱ्या अनेक समस्यांचे विश्लेषण देत, योग्य दिशेने पाठपुरावा करत मांडली तक्रार.
सामाजिक अडचण लक्षात घेता पीएम कार्यालयातून तत्पर सूत्र हलविली गेली, त्याची तत्काळ दखल बँकेने घेतली असा अधिकृत लेखी मेल बँकेने पाठविला असून बँक स्थलांतर थांबविले आहे)


COMMENTS