Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर : विद्येच्या मंदिरातच दहावीच्या विद्यार्थ्याचा खून

अहिल्यानगर : शाळा ही ज्ञानाची मंदिरे असून, या विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले जाते. मात्र विद्येच्या मंदिरातच दहावीच्या विद

उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी मांजरा प्रकल्पातून पाच बॅरेजेसमध्ये सोडले पाणी
१४ व्या राष्ट्रीय सबज्युनीअर चॉकबॉल स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न 
माणिक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप

अहिल्यानगर : शाळा ही ज्ञानाची मंदिरे असून, या विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले जाते. मात्र विद्येच्या मंदिरातच दहावीच्या विद्यार्थ्याचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अहिल्यानगर शहरात बुधवारी दुपारी घडली असून, या विद्यार्थ्यांचा धारदार हत्याराने शाळेच्या आवारात हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या सीताराम सारडा विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या झालेल्या भांडणातून घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने खून केल्यामुळे शाळांची झाडाझडती घेण्याची मागणी होतांना दिसून येत आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, बुधवारी दुपारी सीताराम सारडा विद्यालयाच्या परिसरात काही विद्यार्थ्यांनी दहावीत शिकणार्‍या अफान मुस्तकीर शेख या विद्यार्थ्याचा खून केला आहे. त्याचा खून करणारा विद्यार्थी त्याच विद्यालयात शिक्षण घेत असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या दोन विद्यार्थ्यांमध्ये यापूर्वी वाद झाले असल्याची माहिती आहे. बुधवारी दुपारी ते दोघे विद्यालयात असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि एकाने दुसर्‍यावर शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अफान शेख याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाताच शहर पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खून करणार्‍या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून परिसरात तणावपूर्व शांतता आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात सुरू होती.

विद्यार्थ्यांमधील वाढती हिंसा चिंतेचे कारण
शाळांमध्ये होणारे वाद हे किरकोळ स्वरूपाचे असतात, मात्र त्याचे स्वरूप तीव्र नसते. मात्र विद्यालयाच्या परिसरात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेतील एका मित्राची हत्या केली. यामागचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी, पोलिसांच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येतील, मात्र विद्यार्थ्यांमधील वाढत चाललेली हिंसा चिंतेचे कारण बनतांना दिसून येत आहे.

COMMENTS