Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी पर्व’ महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

दुसऱ्या दिवशी शेतमालाची एक कोटींची विक्रमी उलाढाल अहिल्यानगर : कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व एक्सपो इंडिया ओशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नगर–पुणे रोडवरील नेमाने इस्टेट येथे  ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “कृषी पर्व” कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री  डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट दिली. कृषी विभागामार्फत शेतकरी व बचत गटांनी उत्पादित केलेले धान्य, फळे, भाजीपाला प्रक्रिया उत्पादने तसेच महिला बचत गटांनी तयार केलेले पापड, शेवया, मसाले, लोणची आदी पदार्थांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. अकोले येथून आलेल्या इंद्रायणी, काळभात व जिराभात या तांदळांना ग्राहकांनी खास मागणी दर्शविली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची आतापर्यंत १ कोटी ७ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन मिळावे, यासाठी महोत्सवात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेतीमध्ये एआय व आयओटीचा वापर, भरडधान्य पिकातील संधी, कृषी गतीशीलतेमध्ये एफपीओची भूमिका, तसेच स्टार्टअप सादरीकरण व नेटवर्किंग या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.  कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, कंबाईन हार्वेस्टर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच खते, बियाणे, संरक्षित शेती, सूक्ष्म सिंचन, जैवखते, कृषी अवजारे व कृषीपूरक व्यवसायाविषयी माहिती देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानाअंतर्गत स्वयं-सहायता बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून बनविलेले चटपटीत गावरान खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पाथर्डी तालुक्यातील श्री विवेकानंद विद्यामंदिरने मारली बाजी
विहिरीने गिळंकृत केली 87 पोते सोयाबीन व इतर साहित्य
नगरच्या दोन पत्रकारांचा पोंभुर्ल्यात झाला गौरव…

दुसऱ्या दिवशी शेतमालाची एक कोटींची विक्रमी उलाढाल

अहिल्यानगर : कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व एक्सपो इंडिया ओशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नगर–पुणे रोडवरील नेमाने इस्टेट येथे  ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “कृषी पर्व” कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री  डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट दिली. कृषी विभागामार्फत शेतकरी व बचत गटांनी उत्पादित केलेले धान्य, फळे, भाजीपाला प्रक्रिया उत्पादने तसेच महिला बचत गटांनी तयार केलेले पापड, शेवया, मसाले, लोणची आदी पदार्थांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. अकोले येथून आलेल्या इंद्रायणी, काळभात व जिराभात या तांदळांना ग्राहकांनी खास मागणी दर्शविली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची आतापर्यंत १ कोटी ७ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन मिळावे, यासाठी महोत्सवात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेतीमध्ये एआय व आयओटीचा वापर, भरडधान्य पिकातील संधी, कृषी गतीशीलतेमध्ये एफपीओची भूमिका, तसेच स्टार्टअप सादरीकरण व नेटवर्किंग या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

 कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, कंबाईन हार्वेस्टर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच खते, बियाणे, संरक्षित शेती, सूक्ष्म सिंचन, जैवखते, कृषी अवजारे व कृषीपूरक व्यवसायाविषयी माहिती देण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानाअंतर्गत स्वयं-सहायता बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून बनविलेले चटपटीत गावरान खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

COMMENTS