Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यादेवींचे लोकोपयोगी कार्य हेच त्यांचे खरे स्मरण : प्रा. डॉ. यशपाल भिंगे

श्रीरामपूर : 18 व्या शतकातील लोकोत्तर कार्य करणार्‍या पुण्यश्‍लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विवेकशील चरित्राचा वसा आणि वारसा जपला पाहिजे

पशु-पक्ष्यांना केली पाण्याची सोय
या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. भास्कर जाधव यांची भावनिक साद
गौतमी पाटीलचे सिंधुदुर्गमधील कार्यक्रम रद्द


श्रीरामपूर : 18 व्या शतकातील लोकोत्तर कार्य करणार्‍या पुण्यश्‍लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विवेकशील चरित्राचा वसा आणि वारसा जपला पाहिजे. त्यांनी प्रतिकूल वातावरणात जे लोकोपयोगी विविधांगी कार्य केले, तेच खरे त्यांचे चिरंजीव स्मारक व स्मरण होय, असे विचार नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे प्रा. डॉ. यशपाल नरसिंगराव भिंगे यांनी व्यक्त केले.
येथील स्वयंवर मंगल कार्यालयात यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे लोकमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 229 व्या पुण्यतिथी निमित्त प्रबोधन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. यशपाल भिंगे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये होते. प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्यकारणी चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, वाणिज्य विभागाचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव बारगळ उपस्थित होते. श्रीगणेश आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. यशवंत नागरी पतसंस्थेतर्फे अनेक मान्यवरांचा सन्मान काण्यात आला. गुलाबराव पादीर यांनी अध्यक्षीय सूचना मांडली. चेअरमन बाजीराव रक्टे, व्हा. चेअरमन मधुकरराव सातव, जनरल मॅनेजर माधव निंबाळकर आणि संचालक मंडळाने अनेकांचा बुके, शाल देऊन सत्कार केले. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रकाशराव करडे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा.डॉ. यशपाल भिंगे यांनी सव्वा तासाच्या भाषणातून भारतीय संस्कृती जीवनाचा आढावा घेऊन आपले गणराज्य आणि गणनायक हेच आपले मूळ आहे. राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज तसेच आजचे पुरोगामी विचारवंत यांची तळमळ लक्षात घ्या. हाच विचार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अतुलनीय कार्यातून दिसतो. आंदोलने केल्याशिवाय आपले हक्क मिळणार नाहीत, त्यासाठी तरुणांनीही जागृत झाले पाहिजे असे आवाहन डॉ. भिंगे यांनो केले. छत्रपती संभाजीनगर येथील अड, बन्सी लोणे, सुखदेव सुकळे, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, डॉ. शिवाजी काळे, सचिन काळे, काशिनाथ गोराणे, प्रा. डॉ. मिसाळ आदिंचे सत्कार करण्यात आले. अमोल कदम , मोठ्याभाऊ दातीर, बाळासाहेब लांडे, अंशुमन वाकचौरे, सुरेखाताई सातव, मनिषाताई गवळी, वसंतराव बारगळ, एकनाथराव खेडेकर, गजानन पुंड, रावसाहेब कर डे यांनी कार्यक्रम नियोजनात भाग घेतला. कार्यकमास सर्व संचालक मंडळ, सर्व सेवक, बचत गट आणि नागरिक स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. उपाध्ये यांनी सर्व मान्यवरांना पुस्तके भेट दिली. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले तर माधव निंबाळकर यांनी आभार मानले.

अहिल्यादेवींचा वारसा जपला पाहिजे : डॉ. बाबुराव उपाध्ये
अध्यक्षीय भाषणातून डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्र कर्तृत्वाचा आढावा घेतला. 31 मे 1725 ते 13 ऑगस्ट 1795 या 70 वर्षाच्या आयुष्यातील त्यांचे 28 वर्षाचे राजकीय कर्तृत्व मौलिक स्वरूपाचे आहे. रस्ते, पाणी, झाडे, मंदिरे, धर्मशाळा, रोजगार निर्मिती आणि भयमुक्त समाज अशा त्यांच्या जीवन चरित्राचा आदर्श घेतला पाहिजे. राजमाता अहिल्यादेवी यांनी युद्धमुक्त जीवनाला महत्त्व देऊन विकास कार्याला महत्त्व दिले, तो वारसा जपला पाहिजे असे सांगून यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेने अर्थकारणात व समाजकारणात आदर्श निर्माण केला. असे उपक्रम हे सेवाभावाचे प्रतीक असल्याचे विशद केले.

COMMENTS