Homeताज्या बातम्यामनोरंजन

अहान शेट्टीचे गर्लफ्रेंड तानिया श्रॉफशी ब्रेकअप

मुंबई प्रतिनिधी - सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या 11 वर्षांपासून तो मॉडेल तानिया श्रॉफला डे

मालकाच्या घरी चोरी करणारा नोकर जेरबंद
उन्हाळी कांदा नाफेड मार्फत खरेदीसाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा सकारात्मक प्रतिसाद
भररस्त्यात तरुणावर गोळीबार l LOKNews24

मुंबई प्रतिनिधी – सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या 11 वर्षांपासून तो मॉडेल तानिया श्रॉफला डेट करत होता . तानिया आणि अहान दररोज त्यांच्या रोमँटिक फोटोंने इंटरनेटच्या जगात खळबळी माजवली होती , परंतु आता बातमी अशी आहे की दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. सोशल मीडियावर अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अहान आणि तानिया दीड महिन्यापूर्वीच वेगळे झाले होते. दोघेही सध्या सिंगल असून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांचे ब्रेकअप का झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि तानिया किंवा अहान या दोघांनीही ब्रेकअपची अधिकृत पुष्टी केलेली नाही. जयदेव आणि रोमिला श्रॉफ यांची मुलगी तानिया मॉडेलसोबतच डिझायनरही आहे. अहान आणि तानिया बालपणीचे मित्र होते. दोघेही रोज एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असत. 2021 मध्ये अहानच्या तडप या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी तानिया शेट्टी कुटुंबासोबत दिसली होती  .

COMMENTS