Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषीमंत्री मुंडे, पालकमंत्री सावे हरवले

जालन्यात शेतकर्‍यांनीच लावले बॅनर

जालना/बीड-प्रतिनिधी ः जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडेविरोधात शेतकरी आक्रम झाल्याचे दिसून येत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून

निरंजन जाधव यांनी अमेरिकेतून मिळवली पदवी
श्रीसंत गोरा कुंभार चरित्र समर्पितेचा आदर्श ः ह.भ.प.डॉ.शुभम महाराज
संगमनेर शहरासाठी इंटरचेंज ठेवा : आमदार तांबे

जालना/बीड-प्रतिनिधी ः जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडेविरोधात शेतकरी आक्रम झाल्याचे दिसून येत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड नुकसान झाले अहे. शेतकरी संकटात असतांना कृषिमंत्री धनजंय मुंडे व पालकमंत्री अतुल सावे हे जिल्ह्यात फिरकले नाही. यामुळे राज्याचे कृषिमंत्री मुंडे व पालकमंत्री अतुल सावे हे हरवले असल्याचे बॅनर जालन्याय झळकले आहे.
जालना जिल्ह्यात मागील अडीच महिन्यापासून पावसाचा थेंबही पडलेला नाही. शेतकर्‍यांच्या पिकांची वाळलेली काडी झाली आहे. मात्र शेतकर्‍यांचा कोणी विचार करत नसून राज्यात राजकीय मंडळी राजकीय पोळी भाजण्यात व्यस्त आहे. दुष्काळी परिस्थिती झाली असताना शासनाकडून कोणताही निर्णय किंवा घोषणा शेतकर्‍यांसाठी घेण्यात आलेली नाही. आर्थिक संकटात असलेला शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून कृषीमंत्र्यांसह जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतकर्‍याच्या बांदाकडे पाठ फिरवली आहे. कृषीमंत्री आणि पालक मंत्री कुठं आहे? असा प्रश्‍न निर्माण झाल्याने भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे आणि बरंजळा साबळे गावातील शेतकर्‍यांनी जालना- जळगाव महामार्गांवरील फाट्यावर चक्क कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पालकमंत्री अतुल सावे हरवल्याचे बॅनर लावले आहे. इतकेच नाही तर बॅनर लावून दोन्ही मंत्री कुणाला सापडल्यास मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा; त्या मंत्र्याना पावसाअभावी सुकलेल्या पिकांचा पालापाचोळा भेट देणे आहे अशा आशयाचा बॅनर लावला आहे. हे बॅनर लक्ष वेधत आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत देखील कृषीमंत्री मुंडे यांच्याविरोधात शेतकर्‍यांनी संताप करत मोर्चा काढला. यावेळी शेतकर्‍यांनी विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क व शेतकर्‍यांचे वीज बील माफ करावे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरांना चारा व जनतेला मोफत स्वस्त धान्य उपलब्ध करावे. एम.आर.ई.जी.एस.(रोहयो) अंतर्गत कामे सुरू करण्यात यावीत. यासह विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश करण्यात आला. बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पायी ठेवून दिला जाणार नाही असा संतप्त इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. तसेच मोर्चात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत कृषिमंत्री पदाची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी देखील करण्यात आली.

कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही – पाऊस नसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. परंतु शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही. या विरोधात बीडच्या अंबेजोगाईत महाविकास आघाडीतर्फे जणआक्रोश मोर्चा काढत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर, करा अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही; असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महाविकास आघाडीकडून जणआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा मुख्य मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात बैलगाडी देखील होती. या मोर्च्याच्या माध्यमातून दुष्काळ जाहिर करून शेतकर्‍यांना सरसकट 1 लाख रूपये मदत करावी. 100 टक्के पिक विमा मंजूर करावा. 25 टक्के पीकविमा अग्रीम देण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

COMMENTS