Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मढेवडगाव येथे कृषी मेळावा उत्साहात

श्रीगोंदा : श्री दत्तकृपा शैक्षणिक कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित साईकृपा कृषी महाविद्यालय, घारगाव येथील कृषीकन्या व कृषीदूत यांच्या संयुक्त वि

श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात 
अर्धवट महामार्ग कामामुळे ग्रामस्थ संतप्त; आंदोलन तीव्र
पोदार लर्न स्कूलची ‘डीएसओ’ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

श्रीगोंदा : श्री दत्तकृपा शैक्षणिक कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित साईकृपा कृषी महाविद्यालय, घारगाव येथील कृषीकन्या व कृषीदूत यांच्या संयुक्त विद्यमाने मढेवडगाव येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एच. निंबाळकर होते. उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे व सचिव अर्चना दत्तात्रय पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2025-26 अंतर्गत कृषीकन्या अनिशा रुपनवर, स्नेहल आचार्य, पुनम गायकवाड, प्रणाली मादनकर, प्रणोती महारनवर तसेच कृषीदूत कुणाल काळभोर, यशराज काळाणे, प्रतीक जठार, मनमोहन देवीकर, वैभव कोकरे व अभिजीत क्षीरसागर यांनी या मेळाव्याचे आयोजन केले. मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. के. एच. निंबाळकर यांनी पिकांचे बाजारभाव, आधुनिक शेती तंत्रज्ञान, मशागत व कीड-रोग नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती दिली. गाव पातळीवर शेतकरी समिती स्थापन करून नियोजनबद्ध पीक पद्धती राबविल्यास उत्पादन वाढीस मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणून सिजेंटा, बायस्टेट, बी.ए.एस.एफ., बायर, कोरोमंडल आदी नामांकित कृषी औषध कंपन्यांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, मंडळ कृषी अधिकारी शितल आरु, कृषी सहाय्यक अधिकारी किरण घोडके, संचालक सुभाष शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे, सरपंच प्रसाद महाडिक, चेअरमन सुमन मांडे, पंडित कातोरे, बाळासाहेब मांडे, उपसरपंच राजकुमार उंडे, राहुल साळवे, व्हा. चेअरमन शरद शिंदे, युवा उद्योजक सचिन कातोरे, संदीप औटी,  संतोष पानसरे, फुलसिंग मांडे यांच्यासह कार्यक्रम समन्वयक प्रा. शैलजा औटी, प्रा. नागेश जाधव, प्रा. सुप्रिया बंडगर आदी उपस्थित होते.

COMMENTS