बीड प्रतिनिधी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत बीड शहरामध्ये असणार्या आदित्य कृषि महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या कृषि दुतांन
बीड प्रतिनिधी – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत बीड शहरामध्ये असणार्या आदित्य कृषि महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या कृषि दुतांनी आडगांव ता. जि.बीड येथे शास्त्रीय पद्धतीने फळबाग लागवड केली. दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि उद्योग संलग्न उपक्रम या अंतर्गत राबविण्यात आला.
आधुनिक शेतीमध्ये फळबाग लागवड करण्यामध्ये शेतकर्याचा मोठ्या प्रमाणात कल वाढावा. याच पार्श्वभूमीवर कृषिदुतांनी आडगांव गावातील प्रगतशील शेतकरी गजानन खाटके यांच्या शेतामध्ये एक एकर फळबाग लागवड करून शेतकर्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. प्रामुख्याने शास्त्रीय पद्धतीने दोन झाडातील अंतर व्यवस्थित असेल तर झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो व झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते व तसेच झाडातील अंतर हे प्रमाणात असेल तर झाडाची अंतर्गत मशागत करण्यासाठी सोपे राहते तसेच फळ तोडणी ला येईपर्यंत त्यामध्ये आपण भाजीपाल्यासारखे आंतरपीक घेऊ शकतो यामुळे शेतकर्याचे उत्पादन वाढू शकते व त्याचा फळबाग लागवडीचा खर्च हा कमी होऊ शकतो व अतिरिक्त उत्पन्न शेतकर्यांना मिळू शकते. शास्त्रीय पद्धतीने फळबागेतील अंतर ठेवल्यास फळबागावर पडणारे रोग व कीटक यांचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो व त्यात व्यवस्थापन योग्य पद्धतीने करू शकतो. अशी माहिती याप्रसंगी कृषिदूत संदेश राठोड, बस्वलिंग स्वामी, गोपाल राऊत, ऋत्विक पिसाळ, अक्षय ढेंबरे, विशाल जंजाळ, रितेश वाडकर, रोहित ढेंबरे यांनी दिली . या कार्यक्रमाला गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी उद्यान विद्या विभागाचे प्रमुख विषय तज्ञ डॉ.संदीप मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.आदितीजी सारडा, आदित्य कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुकाराम तांबे ,श्री. श्याम भुतडा कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप मोरे, कार्यक्रमाधिकारी युवराज धवणे व इतर प्राध्यापक व विषय तज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
COMMENTS