पाणीपुरवठा योजनेच्या भ्रष्टाचाराविरोधात पुणतांब्यात आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणीपुरवठा योजनेच्या भ्रष्टाचाराविरोधात पुणतांब्यात आंदोलन

पुणतांबा/प्रतिनिधी : जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असून जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा समिती यांचे योजनेक

नगरला पाणी येईल हो .. पण, फेज टू विलंबाचे काय ? l Lok News24
राहुरीत गावकीच्या सहकाराचे धुराडे पेटले
नाभिक समाज ट्रस्टतर्फे समाजमित्र, कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण

पुणतांबा/प्रतिनिधी : जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असून जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा समिती यांचे योजनेकडे दुर्लक्ष झाले असून या योजनेतील त्रुटी बाबत सोमवारी विकास आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले तीन तास आंदोलन करून जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍याला धारेवर धरण्यात आले योजनेतील आवश्यक कागदपत्रे आठ दिवसात देऊ असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
17 कोटी 37 लाख रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट व योजनेची त्रुटी बाबत सोमवारी विकास आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले यात जीवन प्राधिकरण अधिकारी पाणीपुरवठा कमिटी अध्यक्ष यांनी योजनेचे दुर्लक्ष करून योजनेची वाटोळे केले असा आरोप विकास आघाडीचे नेते धनंजय जाधव यांनी केला वाड्या वस्त्यांवर योजना अपूर्ण ठेवली विरोधक म्हणून जाणीवपूर्वक समितीचे अध्यक्ष आणि याकडे कानाडोळा केला पाणीपुरवठा योजनेच्या कामाकडे लक्ष न देता राजकारण करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायत सत्ताधार्‍यांनी लोकवर्गणीच्या नावाखाली विकास केला लोक वर्गणी यांचा एक कलमी कार्यक्रम करून जनतेची फसवणूक केली पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असताना साठवण तलावातील दगड मुरूम याची परस्पर विले वाट लावली योजना हस्तांतरित नसताना गौण खनिज याची विल्हेवाट लावून यात लाखो रुपयांचा दगड मुरूम चोरीला गेला याबाबत संबंधितावर कारवाई करावी तसेच ग्रामपंचायत च्या माध्यमातून दादागिरी वाळू मुरूम त्याची बेकायदा वाहतूक सत्ताधार्‍यांच्या आशीर्वादाने सुरू असून त्यातून गुंडगिरी वाढल्याचा आरोप जाधव यांनी केला येणार्‍या काळात दादागिरी खपवून घेणार नाही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा जाधव यांनी दिला. जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता एमपी बिन्नर यांनी आंदोलनाला भेट दिली बिन्नर यांना आंदोलन करताना उत्तर देता आले नाही त्यामुळे त्यांना धारेवर धरून संतप्त सवाल विचारून योजनेच्या त्रुटी व दगड मुरूम याची परस्पर कोणी लावली याचे उत्तर द्यावे असा संतप्त सवाल उपस्थित करून अधिकारी व ठेकेदार यांना धारेवर धरले शाखा अभियंता बिन्नर यांना विकास आघाडीचे धनंजय जाधव भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वाढणे वकील सुधीर नाईक चांगदेव धनवटे चंद्रकांत वाटेकर सर्जेराव जाधव गणेश बनकर सुधाकर जाधव प्रताप वाढणे यांनी जाब विचारला. अखेर शाखा अभियंता बिन्नर यांनी लेखी आश्‍वासन दिले योजनेतील आवश्यक कागदपत्रे आठ दिवसात देण्यात येईल असे पत्रात नमूद केले आहे त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाबाबत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना जाब विचारला असून येणार्‍या काळात योजनेच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष होणार आहे. या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सुनंदा जाधव रूपाली जाधव भाऊसाहेब जेजुरकर प्रशांत राऊत अशोक धनवटे संकेत जाधव आदित्य जाधव मधुकर जगदाळे अण्णासाहेब डोके किशोर वाढणे डॉक्टर अविनाश चव्हाण संभाजी गमे मच्छिंद्र जेजुरकर सोपान धनवटे नंदू नवले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भ्रष्टाचाराला जबाबदार कोण ?
पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक सुविधा तसेच निकृष्ट कामा बाबत विरोधकांनी योजनेच्या चौकशीची मागणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती, तरीदेखील या योजनेची सकल चौकशी झाली नाही. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी या योजनेबाबत माहिती देताना कानाडोळा का करतात. हा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेसमोर उभा असून या योजनेची खरोखर चौकशी होणार यात कोणाची जबाबदारी निश्‍चित होणार अधिकार्‍यांना कोण पाठीशी घालते याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

COMMENTS