Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एफआरपीचा बैठकीत निर्णय न झाल्यास आंदोलन; ’बळीराजा’चा इशारा

कराड : बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने एकरकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर आज सातव्या दिवशीही बेमुदत धरणे आंदोलन सुरु राहिले.

राहाता तालुक्यातील गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल  
‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा : दादाजी भुसे
श्रीरामपुरात मोकळ्या कांदा लिलावास सुरुवात

कराड : बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने एकरकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर आज सातव्या दिवशीही बेमुदत धरणे आंदोलन सुरु राहिले. दरम्यान, आज विविध संघटना, संस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. आम्ही साखर आयुक्तांच्या बैठकीची वाट पहात आहोत. त्यात निर्णय न झाल्यास आंदोलन सुरु करणार अशा इशारा बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
कराड (जि. सातारा) येथील बळीराजा संघटनेच्या आंदोलनाच्या आजच्या सातव्या दिवशी बनवडी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास कारंडे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती पिसाळ, आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा विद्या मोरे, अध्यक्षा शांता कोठावळे, काकासाहेब जाधव, संदीप साळुंखे, सुमन कोळी, प्रिया आलेकरी, पुजा भातकर, सुनिता कोळी, नितीन कचरे, अविनाश पवार, सुनिता भोसले यांनी पाठिंबा देत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला व पदाधिकार्‍यांना सांगून तशी पत्रे दिली.
दरम्यान, प्रांतधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत साखर आयुक्तालयात एफआरपीप्रश्‍नी बैठक घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. त्या बैठकीत तोडगा निघेल अशी खात्री आहे. त्यात निर्णय न झाल्यास आंदोलन सुरु करणार अशा इशारा केंद्रीय अध्यक्ष पाटील यांनी दिला.

COMMENTS