सत्तासंघर्षातील आक्रमकता, पण एकाकी..!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सत्तासंघर्षातील आक्रमकता, पण एकाकी..!

महाराष्ट्राच्या राजकीय सत्तासंघर्षात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवेश केल्याच्या बातम्या सध्या पेरल्या जात आहेत. यात त्यांनी अमित शहा आणि भाजप

आता वर्षातून 4 वेळा करता येणार मतदान नोंदणी
Jalna : पिंजारी समाज बांधवांची संघटन बैठक (Video)
महावितरण कंपनीने ग्राहकांच्या हितासाठी काम केलं तर ग्राहक देखील सहकार्य करेल – प्रताप हेगाडे

महाराष्ट्राच्या राजकीय सत्तासंघर्षात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवेश केल्याच्या बातम्या सध्या पेरल्या जात आहेत. यात त्यांनी अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर जबाबदारी सोपवल्याचे सांगितले जात आहे.‌पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले असते तर सुरूवातीलाच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ दिले नसते. राजकारण हे शह-प्रतिशहाचे असले किंवा राजकारणात सर्वात आधी शिष्य हाच गुरूचे पंख छाटतो, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात व्यवहारांत काही बाबींचे पालन करायचे असते, असा अलिखित संकेत असतो. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. यातील काॅंग्रेस या पक्षाशी जुळवून घेणे मोदींच्या स्वभावात नाही. परंतु, कधीकाळी शिवसेनेची साथ त्यांनी घेतली होती. त्याच शिवसेनेत बंडखोरीने उचल खाल्ली असली तरी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी त्यांनी चांगले संबंध राखले आहेत. त्याचबरोबर शरद पवार यांच्याशी मोदींचे दीर्घकालीन मैत्रीसंबंध राहिले आहेत. आजही ते जपले जातात. त्यामुळे पवार दिल्लीला पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेत तर त्यांना मोदी खास वेळ देतात. पवार-मोदी संबंधांचे हे पर्व पाहता महाविकास आघाडीला थेट सत्तेबाहेर फेकणे कदाचित मोदीही स्वतः टाळतील, असे दिसते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राजकीय आक्रमकता पाहता त्यांच्या राजकारणाला मोदींनी फार प्रोत्साहित केल्याचे जाणवत नाही. त्यामुळे, फडणवीस हे असा संघर्ष करताना एकाकी पडलेले जाणवतात. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी फडणवीस यांनी जी भूमिका निभावली ती पाहता विरोधी पक्षनेता त्यांच्यासारखाच हवा. राज्यातील तीन प्रमुख पक्षांना धारेवर धरणारे हे नेतृत्व खरोखरच लोकशाहीच्या सत्तासंघर्षात असावं. महाराष्ट्राच्या राजकारणात वर्तमान जो सत्तासंघर्ष उभा राहिला आहे, त्यात भारतीय जनता पक्षाने थेट भूमिका घेतलेली नाही.‌ मात्र, जसजसे दिवस पुढे जाताहेत तसतसे भाजपला खास करून राज्यातील नेत्यांना सत्ता मिळवण्याची अपेक्षा वाढली असेल, हे नक्की. यात मोदी आणि शहा यांनी साथ दिल्याशिवाय फार काही साध्य होऊ शकत नाही. यात शहा यांच्यावर जबाबदारी सोपवली तर ते अधिक आक्रमकपणे इप्सित साध्य करतात! सत्तासंघर्षाच्या या नाट्यमय घडामोडीत देशातील राजकीय सत्तेतील या अग्रणी जोडीचे मनसुबे राज्याची सत्ता खेचण्याचे गेल्या अडीच वर्षांत जाणवले नाहीत. महाविकास आघाडी सरकारला एक विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली शक्ती दाखवून दिली, त्या शक्तीला केंद्राने बळ पुरवले असे अभावानेच दिसते. नाही म्हणायला, इडी चे माध्यम वापरले जात असले तरी त्यात थेट केंद्रीय नेत्यांचा हात आहे, असे दिसून आले नाही. याउलट महाराष्ट्रात असे म्हटले जाते की, फडणवीस हे बऱ्याचदा इडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असतात; अर्थात यात तथ्ये किती हा भाग अलहिदा आहे. एकंदरीत, आज महाराष्ट्रात जो सत्तासंघर्ष उभा राहिला आहे, त्यात न्यायालय आणि राज्याचे सार्वभौम विधीमंडळ यांचे स्वतंत्र अस्तित्व आणि भूमिका या फार महत्वपूर्ण आणि तितक्याच जटील आहेत. महाराष्ट्राच्या आजच्या या सत्तासंघर्षात म्हणूनच महाविकास आघाडीला फारसा धोका आहे, असे जाणवत नाही. त्यातच आता जाता-जाता बातमी धडकली आहे की, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माननीय दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या निर्णयामुळे सध्याचे बंडखोर नेतृत्व म्हणून पुढे आलेले एकनाथ शिंदे यांना ही चपराक आहे. कारण, शिवसेनेला उचलून धरणारी आगरी-कोळी-भंडारी ही जनता शिंदे यांच्यामुळे शिवसेनेपासून लांब चालली होती, त्यास या निर्णयामुळे पायबंद बसेल आणि एकनाथ शिंदे यांचा जनाधारही लुप्त होईल, अशी राजकीय खेळी करण्यात उध्दव ठाकरे यांनी यश मिळवल्याचे दिसते. हा निर्णय म्हणजे महाविकास आघाडी अधिक आक्रमक होत असतानाही मराठा राजकारणाला शह देण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले !

COMMENTS