Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाढणार्‍या वीजेच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणची वीज चोरीविरोधात कडक मोहीम

मुंबई / प्रतिनिधी : वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी 24,000 ते 24,50

तरडगांव येथील जयश्री अडसूळ बेपत्ता
न्यायाधीशपदी निवड झालेबद्दल सचिन साळुंखे यांचा सत्कार
लवकरच राज्य परिवहन विभागाच्या गाड्यांचे 142 महिलांच्या हाती स्टेअरिंग

मुंबई / प्रतिनिधी : वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी 24,000 ते 24,500 मेगावॅटपर्यंत नोंदवली आहे. मात्र, कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत घट झाली आहे. आपत्कालीन भारनियमन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अतिभारीत वीजवाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. या रोहित्रांवर वीजचोरी आढळ्यास संबंधित ग्राहकांविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी महावितरणच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांची आज ऑनलाईन बैठक घेतली. विजेची चोरी करणार्‍या किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करणार्‍याविरुध्द कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील रोहित्रांवर मंजूर भारापेक्षा जास्त भार असल्यास अशा सर्व रोहीत्रांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्राहकांनी वीजचोरी केली असल्यास वा वीज यंत्रणेवर आकडे टाकून वीजचोरी करणार्‍या विरूध्द नियमानुसार कारवाई करून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा. वीजचोरी करणार्‍या सर्व ग्राहकांवर वीज विधेयक 2003 च्या कलम 135 व 126 नुसार अदखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात यावी.
मुख्यालय पातळीवरून सर्व वीजेच्या वाहिन्याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने अतिभारीत असलेल्या वीज वाहिन्यांची माहिती क्षेत्रीय स्तारावरील संबंधित अधिकार्‍यांकडे पाठवली आहे. रोहित्रांवरील अतिरिक्त भार कमी न झाल्यास सबंधितांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या मोहीमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. तसेच या मोहीमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच भारनियमनाची तिव्रता कमी होईल. ऑनलाईन बैठक प्रसंगी संचालक (मासं) डॉ. नरेश गीते उपस्थित होते. तसेच औरंगाबादचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांच्यासह पुणे व नागपूर येथील प्रादेशिक संचालक, राज्यातील सर्व मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंते उपस्थित होते.

COMMENTS