Homeताज्या बातम्यादेश

युट्यूबवर व्हिडिओ पाहून नवऱ्याने घरीच केली बायकोची डिलिव्हरी

पतीच्या चुकीमुळं गमावला जीव

तामिळनाडू प्रतिनिधी - पतीची एक चूक गरोदर पत्नीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये एक व्यक्ती युट्युब पाहून घरी

राज्यसभेचे 19 खासदार निलंबित
पाच जणांसह 190 मेंढ्यांचा मृत्यू
शेतकर्‍यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको ः मुख्यमंत्री शिंदे

तामिळनाडू प्रतिनिधी – पतीची एक चूक गरोदर पत्नीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये एक व्यक्ती युट्युब पाहून घरीच आपल्या गरोदर पत्नीची नॅचुरल पद्धतीने डिलिव्हरी करत होता. पण याचदरम्यान अति रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला. तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासात युट्युबवर पाहून डिलिव्हरी करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व काही गोष्टी स्पष्ट होतील. जर याप्रकरणात पोलिसांना काही पुरावे सापडले तर आरोपी पतीला अटक देखील केली जाऊ शकते.

आरोपी पतीने युट्युबवर पाहून घरीच डिलिव्हरी कशापद्धतीने करायची याची माहिती गोळा केली होती. पण त्याच्या या धाडसी निर्णयामुळे त्याच्या पतीला आपला जीव गमवावा लागला. लोगनयाकीचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनीच पोलिसांना दिली होती. घरीच डिलिव्हरी केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला.

COMMENTS