अलीपुरद्वार प्रतिनिधी- मॉलमध्ये चॉकलेट चोरताना पकडल्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मानसिक तणावातून एका तरुणीने आत्महत्या केल्य

अलीपुरद्वार प्रतिनिधी- मॉलमध्ये चॉकलेट चोरताना पकडल्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मानसिक तणावातून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अलीपुरद्वार(Alipurduar) येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. जयगाव सुभाषपल्ली राहणारी पूजा घोष 29 सप्टेंबर रोजी आपल्या लहान बहिणीसोबत मॉलमध्ये खरेदीसाठी गेली होती. शॉपिंगदरम्यान तिने तेथील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून चॉकलेट चोरले. मात्र तिला चॉकलेट चोरताना कर्मचाऱ्यांनी पाहिले. यानंतर पूजाने चोरीची कबुली देत माफी मागितली आणि चॉकलेटचे पैसेही दिले. मात्र तरीही मॉलमधील कर्मचाऱ्यांनी तिचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर पूजाला मानसिक धक्का बसला. बदनामी झाल्यामुळे ती मानसिक तणावात राहू लागली. याच तणावातून तिने रविवारी राहत्या आत्महत्या केली.
COMMENTS