कोल्हापूर/प्रतिनिधी ः भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विस्तार क
कोल्हापूर/प्रतिनिधी ः भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी बुधवारी कोल्हापूर दौर्यावर असून, यावेळी महाविकस आघाडीवर टीकेची तोफ डागली. राज्यात सक्षम विरोधक नसून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसनंतर आता काँगे्रस देखील फुटीच्या उंबरट्यावर असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा होता.
चंद्रशेखर राव गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी येत आहेत. नुकतेच ते आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठूरायाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी ते पक्षबांधणीसाठी कोल्हापूरला आले. दरम्यान, त्यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएवरही जोरदार टीका केली. दोन्ही सरकारांकडून देशात लोकांच्या हिताची कोणतीही कामे झाली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील पक्षफुटीवर भाष्य करताना के.चंद्रशेखर राव म्हणाले की, सर्वात आधी काँग्रेस फुटली. शरद पवारांनी काँग्रेसला फोडले होते. आता त्यांचा स्वत:चाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फुटला. शिवसेनाही फुटली. आता असे देखील काही लोकांकडून सांगितले जाते की, काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर आहे. राजकीय पक्षांचे आणखी किती तुकडे होणार आहेत, याचा निर्णय जनता घेईल. माझ्यापेक्षा अधिक जनतेला माहीत आहे. महाराष्ट्रात काही घटना अशाही घडल्या आहेत. ज्यामध्ये काही युवकांनी आपले मतदान कार्ड जाळून टाकले. फोडाफोडीमुळे त्यांनी आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी मतदान कार्ड जाळले, हे सगळे पाहून लोकांनीच काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, असेही के. चंद्रशेखर राव म्हणाले होते. त्यामुळे बीआरएस महाराष्ट्रात चंचुप्रवेश करण्यास इच्छुक असून त्यादृष्टीने बीआरएसची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे
COMMENTS