Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुहा धार्मिक तणावानंतर परस्पराविरोधात गुन्हे दाखल

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील गुहा येथे  सोमवार 13 नोव्हेंबर रोजी कानिफनाथ देवस्थानच्या जुन्या वादातून अमावस्यानिमित्त सुरु असलेल्या पूजा व

कोपरगावमध्ये शुक्र तीर्थ ऑडिओ बुकचे अनावरण  
नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 44 कोटी रुपये
नगरच्या पाण्याची खानेसुमारी सुरू ; पाणी मोजण्यासाठी नेमली पुण्याची संस्था

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील गुहा येथे  सोमवार 13 नोव्हेंबर रोजी कानिफनाथ देवस्थानच्या जुन्या वादातून अमावस्यानिमित्त सुरु असलेल्या पूजा व धार्मिक कार्यक्रमावेळी दोन समाजामध्ये हाणामार्‍या झाल्याची घटना घडली होती. तेंव्हापासून गावात तणावपूर्ण शांतता असून या प्रकारातून झालेल्या या मारहाण प्रकरणी दोन्ही समाजाच्या वतीने एकमेकांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                 कानिफनाथ मंदिरात भजन करायचे नाही, तुम्ही मंदिरातुन बाहेर निघुन जा. असे म्हणत सुमारे 55 लोकांनी मंदिरातील पुजारी व भजन करण्यासाठी आलेल्या लोकांना लाकडी काठी, दांडे व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना 13 नोव्हेंबर 2023 रोजी राहुरी तालूक्यातील गुहा येथे घडली. मंदिरातील पुजारी शंकर किसन मांजरे हे कानिफनाथांच्या मंदिरात होते. तेव्हा तेथे दुसरे पुजारी अरुण पांडुरंग लांबे रा. गुहा, व गावातील भजनी मंडळी बाबासाहेब रामकृष्ण कोळसे, बाळासाहेब विश्‍वनाथ कोळसे, मिराबाई बाळासाहेब कोळसे, अलकाबाई ज्ञानेश्‍वर कोळसे हे तेथे आले व त्यांनी भजन चालु केले. त्यानंतर तेथे इसाक भिक्कन शेख, मैमुना युन्नुस शेख, युन्नुस चाँद शेख, पापा रज्जाक शेख, मुनीर भिक्कन शेख, इसाक हबिब शेख, शायना आयुब शेख, सर्व रा. गुहा ता. राहुरी. हे तेथे आले व म्हणाले की, या ठिकाणी तुम्ही भजन करायचे नाही तुम्ही मंदिरातुन बाहेर निघुन जा. तेव्हा भजनी मंडळी त्यांना म्हणाले की, तुम्ही असे का म्हणता, आज अमावस्या असुन परंपरे नुसार नेहमी प्रमाणे आम्ही आरती करणार आहोत. असे म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी लगेच भजनी मंडळींना लाथाबुक्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळाने तेथे सुमारे 55 आरोपी हातात लाकडी दांडके व कोयते घेवुन आले, जीवे मारण्याची धमकी दिली. शंकर किसन मांजरे, वय 62 वर्षे, रा. गुहा ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पहिली फिर्याद गुन्हा येथील कानिफनाथ मंदिराचे पुजारी शंकर किसन मांजरे यांनी दिली असून, आरोपीविरोधात भादंवि कलम 324, 143, 147, 148, 149,  323, 504, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दर्ग्याच्या पाठीमागे मोठ्या आवाजात भोंगा लावून भजन चालू होते. तेव्हा रज्जाक हबीब शेख हे त्यांना म्हणाले कि, भोंग्याचा आवाज कमी करा, आमचे घरात लहान मुले व वयस्कर माणसे आहेत. असे म्हणाल्याचा राग आल्याने तेथील आरोपींनी फोन करुन गावातुन लोकांना बोलावुन घेतले. त्यावेळी तेथे सुमारे 70 जण हातात लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेवुन आले. आणि त्यांनी मस्जिदला व दर्ग्याला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. मस्जीदच्या पाण्याच्या टाक्या व काचा फोडुन नुकसान केले. तसेच दर्ग्यावर लावलेले झेंडे काढुन दर्ग्याची विटंबना केली. त्यानंतर रज्जाक शेख यांच्या घरासमोर लावलेल्या चार मोटार सायकलचे व एका पे रीक्षाची तोड फोड करुन नुकसान केले. सदर प्रकारामुळे फिर्यादी व साक्षीदार घाबरल्याने ते त्यांचे घरात जावुन बसले होते. त्यावेळी आरोपींनी इसाक भिक्कन शेख, मुन्नीर भिक्कन शेख, इसाक हबीब शेख, युन्नुस चॉदभाई शेख, मैमुना युन्नुस शेख यांना लाकडी दांडे, लोखंडी रॉड व लाथा बूक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. रज्जाक हबीब शेख, वय 56 वर्ष, रा. गुहा, ता. राहुरी. यांच्या फिर्यादीवरून 70 जणांवर गून्हा रजि. नं. 1275/2023 भादंवि कलम 324, 323, 143, 147, 149, 427, 504, 506 प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ हे करीत आहे.

COMMENTS