Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर नाशिकमधील एका दर्ग्याच्या जागेचा मुद्दा चर्चेत

नाशिक प्रतिनिधी - मनसे अध्यक्ष  राज ठाकरे   यांच्या भाषणानंतर अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा  हा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतोय. मुंबई, सांगली

कोपरगाव ते येवला दरम्यान सर्व एसटी बसला थांबे द्या
अखेर कुस्ती महासंघाचे निलंबन  
 मद्यपी वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष  राज ठाकरे   यांच्या भाषणानंतर अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा  हा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतोय. मुंबई, सांगली पाठोपाठ आता नाशिकमधील  एका दर्ग्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला असून हे अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्याची मागणी हिंदू संघटनांकडून  करण्यात आली आहे. 

नाशिकच्या ईदगाह मैदानावर बुधवारी सायंकाळी हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अनेक साधू महंतांनी हजेरी लावली होती. लव्ह जिहाद, धर्मांतरण, हिंदूंवर होणारे अन्याय, बांगलादेशी घुसखोरी यावर या सभेत आवाज उठवण्यात आला. यासोबतच नाशिक शहरात मुस्लिमांकडून धार्मिक स्थळांवर होणाऱ्या अतिक्रमणांचा मुद्दा या सभेत गाजला. गंगापूर रोडवरील प्रसिद्ध नवश्या गणपतीला लागूनच असलेल्या दर्ग्याचे अनाधिकृत बांधकाम हटवण्याबाबत सरकारलाही यावेळी इशारा देण्यात आला.

COMMENTS