Homeताज्या बातम्याक्रीडा

 गुजरातचा पराभूत करुन चेन्नईची फायनलमध्ये धडक

  चेन्नई प्रतिनिधी - चेन्नई सुपरकिंग्सने आणखी एका आयपीएल फायनलमध्ये धडक दिली आहे. प्ले-ऑफच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नईने गुजरातचा 15 रननी

पर्यटन विकास योजनेतून टेबल लॅन्ड पठारावरील वाहनतळासाठी 1 कोटी 13 लाखाचा निधी : आ. पाटील
आयपीएलमध्ये पहिल्यांदा कर्णधार बनलेल्या सूर्यकुमारला मोठा फटका
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात : सुनील केदार

  चेन्नई प्रतिनिधी – चेन्नई सुपरकिंग्सने आणखी एका आयपीएल फायनलमध्ये धडक दिली आहे. प्ले-ऑफच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नईने गुजरातचा 15 रननी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा 20 ओव्हरमध्ये 157 रनवर ऑलआऊट झाला. शुभमन गिलने सर्वाधिक 42 रन केल्या तर राशिद खान 30 रनवर आऊट झाला. या दोघांशिवाय गुजरातच्या इतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

चेन्नईकडून दीपक चहर, महीश तीक्षणा, रवींद्र जडेजा आणि पथिराणा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर तुषार देशपांडेला एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 172/7 पर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाडने 60 तर डेवॉन कॉनवेने 40 रन केले. गायकवाड आणि कॉनवे या ओपनरनी 87 रनची पार्टनरशीप केली. रवींद्र जडेजानेही 22 रनचं महत्त्वाचं योगदान दिलं. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, याशिवाय दर्शन नलकांडे, राशिद खान आणि नूर अहमद यांनी 1-1 विकेट घेतली.

गुजरातविरुद्धच्या या विजयासह चेन्नईन आणखी एका आयपीएलची फायनल गाठली आहे. 14 मोसमांमधली चेन्नईची ही 10 वी आयपीएल फायनल आहे.

COMMENTS