Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

28 वर्षांनी पुन्हा भरली इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा

श्री रामेश्‍वरदास विद्यालय हातगावचे 1994- 95 च्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात

शेवगाव प्रतिनिधी ः श्री रामेश्‍वर दास विद्यालय हातगाव येथे दहावीच्या 1994 -95 मधील बॅच चे  स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले या निमित्ताने तब्

दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी झाल्याचे समाधान
विश्‍वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धेत सहभागी व्हा ः राजेंद्र फंड
इंडिया आघाडीची 4 जूनला ‘एक्सपायरी डेट’

शेवगाव प्रतिनिधी ः श्री रामेश्‍वर दास विद्यालय हातगाव येथे दहावीच्या 1994 -95 मधील बॅच चे  स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले या निमित्ताने तब्बल 28 वर्षानंतर मित्र, मैत्रिणीचे आणि गुरुजनांच्या भेटी झाल्या , प्रत्येकाच्या चेहर्‍यावर भेटीचा उत्साह दिसून येत होता. स्नेहसंमेलनाची सुरुवात शिवाजीराव पाटील, संगीता पाटील, मुरकुटे, भुसारी, खामकर, मुख्याध्यापक शिंदे सर,यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.
28 वर्षाच्या कालावधीत मृत्यू झालेले शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मुरकुटे सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, निकम, मस्के यांनी देखील मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून शिवाजीराव पाटील यांनी जीवनातील शिक्षकांचे महत्त्व, आपले समाजाप्रतीचे कर्तव्य, शाळे प्रतीचे असलेले कर्तव्य सांगत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्राथमिकचे शिक्षक सोनटक्के गुरुजी, उंदरे गुरुजी, खताळ गुरुजी, जैनुद्दीन शेख, नंदू अभंग, सरपंच अरुण मातंग यांची देखील उपस्थिती होती. आपल्या शिक्षकांना भेटत असताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला. याप्रसंगी सर्व गुरुजनांचे शाल, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेला विविध महामानवाचे 25 फोटो फ्रेम भेट देण्यात आले. शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शिंदे सर यांनी पेन भेट दिले. सर्व मित्र-मैत्रिणीनी पुन्हा लवकर भेटण्याचा संकल्प करत एकमेकांचा निरोप घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक देशमुख, भाऊसाहेब घुले, रामदास रामावत, प्रदीप जाधव, सत्यनारायण बुटे, कृष्णा साळुंके, मंगेश भराट, पोपट जाधव, प्रफुल्ल पाटील लष्करे, संदीप शेगुळे, सुनील ठोकळ, भागवत दहिभाते, शिवाजी डोईफोडे, रामेश्‍वर सुसे, अरुण गुंजाळ, अर्जुन मिसाळ, भाऊसाहेब भिसे, अर्जुन गवळी, सुरेश अभंग, शिवाजी गायकवाड, सुभाष काशीद, गीताराम अभंग, अन्सार शेख, नवनाथ अभंग, विष्णू साखरे, विठ्ठल गायकवाड, दिल शान शेख, बाबासाहेब निकाळजे, शकील इनामदार, गीताराम अभंग, एकनाथ भालेराव, सरला उन्मेघ, वंदना भालेराव, वंदना पवार, अलका शिंदे, अलका अभंग, मीरा जराड, संगीता अभंग, आशा कोरडे, सुलोचना साखरे, स्वाती मानूरकर, रेखा सोनटक्के, रंजना झंज, आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम औराळकर यांनी केले. तर प्रास्ताविक प्राचार्य रामदास रामावत यांनी करत जुन्या आठवणींना उजाळा देत गेट-टुगेदरचं महत्त्व सांगितले. तर कार्यक्रमाचे आभार अ‍ॅड. भाऊसाहेब घुले यांनी मानले.

COMMENTS