Homeताज्या बातम्यादेश

श्रद्धाची हत्या केल्याचा पश्‍चाताप नाही पॉलिग्राफ चाचणीमध्ये आफताबचे धक्कादायक वक्तव्य

आज करणार नार्को टेस्ट

नवी दिल्ली प्रतिनिधी :- आपण रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याची कबुली आफताबने दिली होती. मात्र नुकतीच पोलिसांनी आफताबची पॉलिग्राफ चाचणी केल

शरद पवारांचा पुन्हा यू टर्न
राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकर जाहीर होणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार 
इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला

नवी दिल्ली प्रतिनिधी :- आपण रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याची कबुली आफताबने दिली होती. मात्र नुकतीच पोलिसांनी आफताबची पॉलिग्राफ चाचणी केली. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे आफताबने केल्यामुळे श्रद्धाची हत्या केल्याचा पश्‍चताप अजूनही अफताबला नसल्याचे समोर आले आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता दिवसेंदिवस नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी आफताबने ज्या हातोडयाने आणि करवतीने श्रद्धाची हत्या करत विल्हेवाट लावली, ती सर्व हत्यारं आता दिल्ली पोलिसांना सापडली आहेत. याशिवाय पोलिसांना दिल्लीतील जंगलांमध्ये आणि आफताबच्या किचनमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले असल्याचीही माहिती आता समोर आली आहे. परंतु आता दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली असून त्यात त्याने धक्कादायक वक्तव्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार, आरोपी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली. त्यात त्याने श्रद्धाची निर्घृणपणे हत्या केल्याची पुन्हा कबुली दिली आहे. याशिवाय श्रद्धा वालकरच्या हत्येबाबत कोणताही पश्‍चाताप नसल्याचे सांगितले. पोलिसांना त्याचे हे वक्तव्य ऐकून आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी आज म्हणजेच एक डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आणखी काही सत्य समोर येण्याची शक्यता आहे. आरोपी आफताबची ही पाचवी आणि शेवटची पॉलिग्राफ टेस्ट असून त्याचा रिपोर्ट तयार केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय आता आरोपीची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण झाल्यानंतर आता नार्को टेस्ट करण्याचीही परवानगी कोर्टाने दिल्यानं या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला धार येणार आहे. जेव्हा आफताबला पॉलिग्राफ टेस्टसाठी नेले जात होते त्यावेळी त्याच्यावर काही हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने हल्ला केला होता. त्यानंतर आता त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आरोपी आफताबनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये असताना एका सायकोलॉजिस्ट तरुणीला रुमवर बोलावले होते. ते अनेक तास रुममध्ये होते. त्यामुळे आता ती तरुणी कोण होती, याची ओळख दिल्ली पोलिसांनी केली असून तिलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने मुंबईच्या वसईत आफताबच्या कुटुंबियांची आणि मित्रमैत्रिणींची चौकशी केली असून त्यातूनही प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याची चाचपणी केली आहे.

COMMENTS