Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसैनवर अफरातफरीचा गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्रीमती आयेशा हुसैन यांच्यावर नागपूरच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात अफरातफरीचा गुन्

प्रत्येकाची दिवाळी मंगलमय व गोड व्हावी यासाठी सामाजिक उपक्रमाची गरज – भूपेंद्र रासणे
भंडारदर्‍याच्या काजवा महोत्सवाची जय्यत तयारी
देशाच्या भवितव्यासाठी प्रत्येक नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे काळाची गरज – समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्रीमती आयेशा हुसैन यांच्यावर नागपूरच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालकाकडून पावतीव्दारे घेतलेली 23 हजार रूपयांची रक्कम आपल्या पदाचा गैरवापर करून शासन जमा न करता स्वतःच्या फायद्याकरिता वापरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत नागपूर येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल नामदेव डाके यांनी फिर्याद दिली आहे.

श्रीमती आयेशा हुसैन या मोटार वाहन निरीक्षक म्हणून 19 सप्टेंबर 2019 ते 6 सप्टेंबर 2021 या कालावधीत नागपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (नागपूर शहर) याठिकाणी कार्यरत होत्या. सध्या त्या नगरला कार्यरत आहेत. दरम्यान त्यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी वाहन (क्रमांक एमएच 40 बीजी 8576) या वाहनाची तपासणी आमडी फाटा (परशिवनी रोड) परिसरात केली असता वाहन चालक चेतमनी रघुवंशप्रसाद मिश्रा यांच्या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करतांना आढळून आले. या वाहनावर ई-चलन नुसार मोटार वाहन कायद्यातील कलम 13 / 194 (1) प्रमाणे तडजोड शुल्क रूपये 23 हजार ई-चलन प्रणालीवर उपलब्ध सुविधेनुसार पावती (क्र. एमएचसीआर 61600210818024836) अन्वये आयेशा हुसैने यांच्याव्दारे रोखीने वसूल करण्यात आले होते. सदरची रक्कम प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर शहर येथे भरणे आवश्यक होते, परंतु त्यांनी सदरची रक्कम भरणा केली नाही. याबाबत दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी निदर्शनास आल्याने त्याबाबत प्रादेशिक परिवाहन अधिकारी कार्यालय नागपूर शहर यांच्यामार्फत सुरू असलेल्या चौकशी दरम्यान आयेशा हुसैन यांनी केलेल्या कारवाईबाबत माहिती घेऊन त्यांना दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी यांना कार्यरत असलेल्या ठिकाणी म्हणजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अहमदनगर याठिकाणी ज्ञापन पाठविण्यात आले असता, दिनांक 1 मार्च 2023 रोजी आयेशा हुसैन यांनी फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क करून व्हॉट्सअपवर लेखी पत्र पाठविले व ज्ञापन प्राप्त झाल्याबाबत सांगुन कार्यालयातील थकीत असलेली शासकीय महसूल रक्कम रूपये 23 हजार शासनजमा करीत असल्याबाबत विनंती केली होती. या पत्राबाबत फिर्यादींनी वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली. मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसैन यांनी गैरव्यवहार करण्याच्या हेतूने, आपल्या पदाचा गैरवापर करून सदर शासकीय रोख रक्कम स्वतःच्या वापराकरीता शासन जमा न करता, जवळपास 18 महिने स्वतःच्या फायदयाकरीता वापरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS