Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोकर वकील अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. परमेश्वर पांचाळ; उपाध्यक्षपदी अ‍ॅड. बालाजी सूर्यवंशी यांची निवड

भोकर । प्रतिनिधी भोकर येथील वकील अभिवक्ता संघाच्या कार्यकारिणीची निवडणूक गुरुवार दि. 12 रोजी उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निव

मानवतेची महान सेवा – जीवनदान देणार्‍या एम्ब्युलन्स सेवेचा भोकरमध्ये भव्य शुभारंभ
नगर परिषदेच्या वतीने भोकरमध्ये स्वच्छता अभियान
पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

भोकर । प्रतिनिधी
 भोकर येथील वकील अभिवक्ता संघाच्या कार्यकारिणीची निवडणूक गुरुवार दि. 12 रोजी उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ड. परमेश्वर पांचाळ तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. बालाजी सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
निवडणुकीनंतर नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सचिवपदी अ‍ॅड. किशोर राठोड, कोषाध्यक्षपदी अ‍ॅड. वेंकटेश कुलकर्णी यांची निवड झाली आहे. तसेच सहसचिवपदी राजेश्वर चव्हाण, विशिष्ट सहाय्यकपदी अ‍ॅड. सुहासिनी कदम आणि महिला प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड. सुजाता कांबळे यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष अ‍ॅड. परमेश्वर पांचाळ यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, अभिवक्ता संघातील सर्व वकील बांधवांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर दिला जाईल. न्यायालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुकर व्हावे यासाठी संघाच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जातील. संघाच्या एकजुटीला अधिक बळकटी देत सर्व सदस्यांना सोबत घेऊन कार्य करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS