Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी; मराठा आरक्षण आंदोलनादरम्यानचे वक्तव्याने अडचणींत वाढ

सातारा / प्रतिनिधी : छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने 4 दिव

वडी येथील युवकाचा खून; चौघांना अटक; एकजण फरार
प्रतीक पाटील हे राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी …?
सातारा जिल्हा प्रशासनातर्फे महाबळेश्‍वर येथे राज्यपालांचे स्वागत

सातारा / प्रतिनिधी : छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सातारा शहर पोलिसांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना अटक करून आज दुपारी न्यायालयात हजर केले. 6 वे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तीवाद करण्यात झाला. युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी महत्वपूर्ण निर्णय दिला.
सरकार पक्षाने 14 दिवसांची पोलीस कोठडी मागत विविध प्रकरणांचा तपास करावयचा असल्याची न्यायालयासमोर मांडणी केली. यावेळी तपासी अधिकारी आणि सरकार पक्षाचे दोन वकील असे तिघांनी सुनावणीमध्ये भाग घेतला. सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने सर्व मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न झाला. तसेच तपासासाठी अ‍ॅड. सदावर्ते यांना पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. युक्तीवाद सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये दोनदा खडाजंगी झाली. खा. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत पराभव का झाला? असा मुद्दा बचाव पक्षाने मांडताच सरकार पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला. यावर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने संबंधित वक्तव्य मागे घेत न्यायालयाची माफी मागितली. माफीनाम्यानंतर सरकार पक्षाने सुमोटो गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
आज गुड फ्रायडे निमित्त न्यायालयास सुट्टी होती. तसेच सर्व शासकिय कार्यालयांनाही सुट्टी असल्याने न्यायालयात फारशी गर्दी नव्हती. मात्र, अ‍ॅड. सदावर्ते यांच्याबाबत आज सुनावणी असल्याने सुनावणीपूर्वी आणि सुनावणीनंतर सातारा शहर पोलीस ठाणे ते न्यायालय या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मराठा आंदोलनादरम्या केलेले वक्तव्य अ‍ॅड. सदावर्ते यांना किती महागात पडणार आहे, याची ही पहिली झलक असल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. यानिमित्ताने अ‍ॅड. सदावर्ते यांचे कुटुंबिय अडचणीत येवू लागले आहेत. नुकतीच हाती आलेली माहिती अशी की, अ‍ॅड. सदावर्ते यांची पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

COMMENTS